Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

Rupali Chakankar Arrest: महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही चाकणकरांच्या अडचणी काही कमी होत नाहीत. आता चाकणकरांना अटक करण्याची मागणी करण्यात आलीय.. मात्र ही मागणी कुणी केलीय.? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Pressure mounts on Rupali Chakankar as arrest demands intensify following the Kharat case controversy.
Pressure mounts on Rupali Chakankar as arrest demands intensify following the Kharat case controversy.
Published On

हा व्हिडीओ नीट पाहा. महिलांवर अत्याचार करणारा भोंदू कॅप्टन अशोक खरात. याच विकृत खरातच्या डोक्यावर छत्री धरणं असो वा त्याचे पाय धुणं. याच कारणामुळे तत्कालिन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा लागला.मात्र राजीनाम्यानंतरही चाकणकरांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीत.आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांना अटक करण्याच्या मागणीनं जोर धरलाय.

एका बाजूला अटकेची मागणी होत असताना दुसरीकडे ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही हकालपट्टी करण्याची मागणी केलीय.तर चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळांनी मांडलीय.

Pressure mounts on Rupali Chakankar as arrest demands intensify following the Kharat case controversy.
राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार? दोन नावांची चर्चा, कोण आहेत 'त्या' महिला नेत्या?

विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला गुरु मानलं आणि त्याचे पाय धुतल्याने चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. आता या प्रकरणी चाकणकरांच्या संपत्तीची चौकशी कऱण्याची मागणी अंधारेंनी केलीय. आता एसआयटीच्या प्रमुख तेजस्वीनी सातपुते या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी रुपाली चाकणकरांना ताब्यात घेणार का? आणि अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हाती कोलित मिळू नये म्हणून चाकणकरांना अटक होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com