Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले

Mumbai Kolkata National Highway Robbery News : मुंबई–कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व वाहन चालकांना मारहाण करून लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी १२ तासांत अटक केली. यामध्ये शासकीय कर्मचारी आणि पोलिस भरतीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा हात असल्याचं उघडं झालं आहे.
Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले
Mumbai Kolkata National Highway Robbery Saam Tv
Published On
Summary
  • मुंबई–कलकत्ता महामार्गावर सिने-स्टाईल चोरी

  • १२ तासांत १२ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

  • टोळीत सरकारी कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्याचाही समावेश

  • भंडारा पोलिसांची आतापर्यंतची मोठी कारवाई

कोकणात जाणाऱ्या गाड्या भोगद्यात शिरताच काही टोळकी प्रवाशांचे फोन तसेच मौल्यवान वस्तू चोरत असतं. याप्रकरणी तातडीने कारवाई करून पोलिसांनी या चोरांना बेड्या ठोकल्या. यानंतर मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर सिने स्टाईल सापळा रचुन १२ जणांची टोळी महामार्गावरून जाणाऱ्या चालकांना मारहाण करून लूट करायचे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी १२ तासांच्या आत १२ चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर १२ जणांची टोळी भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर खिळ्यांची लोखंडी पट्टी महामार्गावर टाकायचे. आणि भरधाव ट्रकसह अन्य वाहनांना सिनेस्टाईल थांबून वाहनातील चालक आणि क्लिनरला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड हिसकवायचे.

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले
Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

१२ जणांच्या टोळीनं मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावर मध्यरात्री अक्षरशः उच्छाद मांडला होता. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री या टोळीनं एकापाठोपाठ चार ट्रकला लुटलं. त्यात रायपूर इथून कर्नाटकाकडे तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला थांबवून त्याच्या काचा फोडून, चालकाला मारहाण करीत १५ हजारांची रोकड लुटली.

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले
Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

चालकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत १२ आरोपींना अटक केली. या ट्रक चालकाच्या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली. रोड रॉबरी करणाऱ्या १२ जणांच्या या टोळीत खून आणि लुटमार करणारे अट्टल गुन्हेगार, एक शासकीय कर्मचारी, एक ग्रामपंचायत सदस्य आणि पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चौघांचा समावेश आहे.

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले
Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

हे आरोपी भंडारा, गणेशपूर आणि नागपूर जिल्ह्यातील आहेत. या घटनेसाठी आरोपींनी वापरलेली झायलो वाहन, तीन दुचाकी, आरोपींचे मोबाईल, लाठ्याकाठ्या, खिळ्यांची लोखंडी पट्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गँगमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? या दृष्टीनं भंडारा पोलिस अधिक तपास करीतं आहेत. एखाद्या प्रकरणात १२ जणांच्या गँगला एकाचवेळी अटक केल्याची भंडारा पोलिसांची ही पहिलीचं मोठी कारवाई आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com