Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Mumbai Mira Bhayandar Leopard News : महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असतानाच आता मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात बिबट्याने तीन नागरिकांवर हल्ला केला आहे. तिघेही गंभीर जखमी असून वन विभागाकडून शोधमोहीम सुरू आहे.
Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...
Mira Bhayandar LeopardSaam Tv
Published On
Summary
  • मीरा भाईंदरमध्ये बिबट्याचा तीन जणांवर हल्ला

  • मुंबईसारख्या शहरातही बिबट्याचा शिरकाव

  • पुणे शिरूरमध्ये बिबट्याची शिकार सीसीटीव्हीत कैद

  • राज्यभर बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण

राज्यभर सध्या बिबट्यांच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेक खेड्यांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर असलेला पाहायला मिळतो. अशातच आता मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात देखील बिबट्याने एंट्री केली आहे. मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात देखील बिबट्याने धुमाकूळ घालत तीन जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये बिबट्याने ४ वर्षाच्या चिमुकल्याला अंगणात खेळताना अंधाराचा फायदा घेऊन त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाल्याच्या घटना आहेत. खेड्या पाड्यात गवतात धावणारा हा बिबट्या आता चक्क मुंबईतील मानवी वस्तीत शिरला आहे.

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...
Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात बिबट्याने शिरकाव केला आहे. पारिजात इमारतीच्या परिसरात हा बिबट्या घुसला असून बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला आहे. तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुण्यात बिबट्याने कुत्र्याची केली शिकार

दुसरीकडे पुण्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथे घरासमोर बिबट्याने कुत्र्याची शिकार केली असून त्यानंतर दुसऱ्या शिकारीच्या शोधात तो पुन्हा घरासमोर फिरताना दिसला. बिबट्याच्या हल्ल्याची क्रूरता आणि शिकारीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com