Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

Pune Maval Bikers Stunt News : जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील खंडाळा घाटात बायकर्सकडून सातत्याने जीवघेणी स्टंटबाजी केली जात आहे. नियम धाब्यावर टांगत सुरू असलेल्या या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
Pune Maval Bikers StuntSaam tv
Published On
Summary
  • खंडाळा घाटात बायकर्सकडून जीवघेणी स्टंटबाजी

  • सोशल मीडियासाठी नियम धाब्यावर टांगले जात

  • प्रवासी आणि वाहनचालकांच्या जीवाला धोका

  • नागरिकांकडून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी

दिलीप कांबळे, मावळ

जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर खंडाळा घाटात काही बेदरकार बायकर्सकडून जीवघेणी स्टंटबाजी केल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर टांगत हे बायकर्स भरधाव वेगात स्टंट करत असून त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांचा व प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या स्टंटबाजीच्या व्हिडिओ आपण पाहतो. कोणी हात सोडून गाडी चालवत आपला रुबाब दाखवतो तर, कोणी गाडीचा स्पीड वाढवून आपली कार किती वेगात धावते हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हे कायद्याने अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारच्या स्टंटने जीवितहानी होऊ शकते.

Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! 'एफसी' रोडवरील वाहतुकीत मोठे बदल; वाचा पर्यायी मार्ग

त्यामुळे सरकारने वाहन चालकांवर वेगवेगळे नियम घातले आहे. मात्र पुणेकर हे न घाबरता आणि जीवाची पर्वा न करता दुचाकी चालवत स्टंट करताना दिसून येत आहेत. या प्रकारामुळे महामार्गावर अपघाताची भीती निर्माण झाली असून अनेक वेळा वाहनचालक घाबरून ब्रेक मारल्याने लहान मोठे अपघात देखील झाले आहे. पुण्यातील अपघातांची मालिका अशा स्टंटबाजीमुळे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे.

Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
Today Weather : राज्यात थंडीचा कहर! जेऊरचा पारा ६ अंशांवर, मध्य महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’, आज कसं असेल हवामान? वाचा

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित बायकर्सवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, वारंवार तक्रारी होऊनही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अशा स्टंटबाजीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून या बेजबाबदार बायकर्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com