Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! 'एफसी' रोडवरील वाहतुकीत मोठे बदल; वाचा पर्यायी मार्ग

Pune Fergusson College Road News : पुणे पुस्तक महोत्सव २०२५ मुळे फर्ग्युसन कॉलेज रोडवर आजपासून २१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी एफ सी रोड टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! 'एफ सी' रोडवरील वाहतुकीत मोठे बदल; वाचा पर्यायी मार्ग
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • एफ सी रोडवर आजपासून २१ डिसेंबरपर्यंत वाहतूक बदल

  • पुणे पुस्तक महोत्सव २०२५ मुळे गर्दीची शक्यता

  • नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

  • महोत्सवासाठी विशेष पार्किंग व प्रवेश व्यवस्था

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय (एफ सी) रोड ने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आजपासून २१ डिसेंबर पर्यंत एफ सी रोडवर आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल होणार. एफ सी रोड वरून न जाता, पर्यायी रस्ता मार्ग वापरण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरीता व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच पुणे शहर परिसरातील शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि नागरीक असे मिळून अंदाजे मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! 'एफ सी' रोडवरील वाहतुकीत मोठे बदल; वाचा पर्यायी मार्ग
Today Weather : महाराष्ट्रात जम्मू काश्मीरचा फील! तापमान घसरलं, 'या' ठिकाणाचा पारा ५ अंशावर, मुंबई-पुणेकर थंडीने गारठले

जंगली महाराज रोड व फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा

१. जंगली महाराज रोडने कर्वे रोड करीता बालगंधर्व डावी कडे वळून, नदीपात्र रोडने, महादेव मंदीर येथून इच्छित स्थळी.

२. कर्वेरोड कडून एफ. सी. कॉलेज रोडने शिवाजीनगर कडे जाण्याकरीता कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोडने, सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी

३. पुस्तक महोत्सव करीता येणारे नागरीकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. ३ संत तुकाराम महाराज पादुका चौक येथून दुचाकी चारचाकी / बस इत्यादी वाहनांना एफ. सी. कॉलेज मधील पार्किंग ग्राऊंड करीता प्रवेश देण्यात येणार आहे.

४. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरिकांनी बाहेर जाण्याकरीता एफ. सी. कॉलेज गेट नं. ४ चा वापर करावा.

५. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांनी फक्त पायी जाण्यासाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. २ चा वापर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com