Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत

Ahilyanagar Bank Election Result Update: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व पाहायला मिळालं.
Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत
Ahilyanagar Bank Election ResultSaam Tv
Published On: 
  • अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल

  • अहिल्यानगर जिल्हा बँकेवर विखे थोरात गटाचे वर्चस्व

  • जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय कोण घेणार

  • सुजय विखे पाटील यांचे चेअरमनपदाबाबत सूचक विधान

  • पारनेरमध्ये निलेश लंके यांचा राहुल शिंदे यांच्यावर विजय

सुशील थोरात, अहिल्यानगर

अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या बँकेच्या 21 संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सुरुवातीलाच 11 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरित 10 जागांसाठी प्रत्यक्ष मतदानाची चुरस आज रंगली होती. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलं होतं ते पारनेरमधील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या लढतीकडे. या ठिकाणी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्याविरुद्ध भाजपचे आणि सुजय विखे यांचे निकटवर्ती असलेले राहुल शिंदे यांच्यात ही लढत होती मात्र या लढतीत खासदार निलेश लंके यांनी विजयाचा गुलाल घेत पुन्हा एकदा पारनेर तालुक्यात आपली वर्चस्व सिद्ध केले आहे.

निलेश लंके यांनी शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर एकत्रित विविध ठिकाणी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र खासदार निलेश लंके वगळता एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत 21 पैकी 17 जागा जिंकत विखे- थोरात गटाने बाजी मारली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पारंपरिक विरोधक एकत्र आले तर नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील 'परिवर्तन पॅनल' अशी थेट लढत झाली होती.

Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत
Election: विधानसभेसाठी आपची ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?

पूर्वीच्या 11 जागा आणि आजच्या 10 जागांपैकी 6 जागा अशा मिळून 17 जागा मिळवत थोरात-विखे यांच्या सहकार पॅनलने बँकेवर ताबा मिळवला. तर अपक्ष असलेल्या संजीवनी शिंदे यांनी सहकार पॅनलच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावल्यामुळे त्यांचाही पाठिंबा सहकार पॅनलला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 18 जागा झाल्याने बँकेची सत्ता विखे- थोरात गटाकडे असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो उमेदवार ठरतील तोच या बँकेचा चेअरमन असेल असे माहिती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत
Jalgaon SBI Bank Robbery: भरदिवसा स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, आरोपींना सिनेस्टाईलने पकडलं

अहिल्यानगर जिल्हा बँक जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्तेचं महत्त्वाचं केंद्र आहे. याच बँकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 4 महिन्यांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. मंत्री, आमदार, खासदार आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावण्यात आली होती. संचालकपदांच्या 21 जागांपैकी विखे थोरात गटाने 17 जिंकत सर्वाधिक जागांवर वर्चस्व मिळवलं आहे. तर विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस आणि भाजप यांचा संघर्ष सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली तर सत्तेतील शिवसेना शिंदे गट हा त्यांच्या विरोधात उतरला होता.

Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत
Bank Fraud : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? घाबरू नका! RBI च्या नियमांनुसार मिळू शकतो पूर्ण रिफंड

या निवडणुकीमुळे पहिल्यांदाच निवडणूक लढवलेले खासदार निलेश लंके आणि सभापती राम शिंदे यांच्या समर्थकांचा सहकार क्षेत्रात चंचू प्रवेश झाला आहे. खासदार नीलेश लंके (पारनेर), सभापती राम शिंदे यांच्या गटाचे सचिन घुमरे (जामखेड), ज्योती शिंदे (कर्जत) आणि अकोलेमध्ये संजीवनी गोविंद शिंदे हे स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. खासदार लंके यांच्या परिवर्तन मंडळाला त्यांच्याच रुपाने एक जागा मिळाली. राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे हेही एकतर्फी निवडून आले. कर्जतमध्ये शिंदे समर्थक असणार्‍या ज्योती शिंदे यांनी बाजी मारली. अकालेत सोसायटी मतदारसंघात आमदार किरण लहामटे यांचा पराभव झाला.

Ahilyanagar Bank Election Result: अहमदनगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात गटाचं वर्चस्व, अध्यक्षपद कोणाकडे जाणार? निकाल लागताच सुजय विखेंचं सूचक संकेत
Satara Bank Election: साताऱ्यात महायुतीत सत्तासंघर्ष! DCC बँकेच्या अध्यक्षपद कोणाकडे जाणार? कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.