Satara Bank Election: साताऱ्यात महायुतीत सत्तासंघर्ष! DCC बँकेच्या अध्यक्षपद कोणाकडे जाणार? कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

Satara DCC Bank Election Results: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर झाला आहे. आता बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Satara Dcc Bank Election Results: Bjp 9, Ncp 8, Shiv Sena 4; Who Will Get The Chairman's Post?
Satara Dcc Bank Election Results: Bjp 9, Ncp 8, Shiv Sena 4; Who Will Get The Chairman's Post?saamtv
Published On: 
Summary
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी निवडणूक

  • भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकत पहिला क्रमांक मिळवला.

  • पाटण आणि माण तालुक्यातील लढतींकडे विशेष लक्ष लागले होते.

अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या बँकेच्या 21 संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सुरुवातीलाच 9 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरित 12 जागांसाठी प्रत्यक्ष मतदानाची चुरस रंगली होती. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलं होतं ते पाटण आणि माण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लढतींकडे. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात भाजपचे सत्यजित पाटणकर मैदानात होते. दरम्यान बँकेच्या निकालानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागलंय.

Satara Dcc Bank Election Results: Bjp 9, Ncp 8, Shiv Sena 4; Who Will Get The Chairman's Post?
आमदारांच्या नाराजीनंतर आता राजीनामा सत्र सुरू; खासदाराचा तडकाफडकी राजीनामा, NC ला मोठा धक्का

सातारा जिल्हा बँक जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्तेचं महत्त्वाचं केंद्र आहे. याच बँकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 4 महिन्यांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. मंत्री, आमदार, खासदार आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावण्यात आली होती.संचालकपदांच्या 21 जागांपैकी भाजपने 9 जागा जिंकत सर्वाधिक जागांवर वर्चस्व मिळवलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 8 आणि शिवसेनेने 4 जागांवर बाजी मारलीय.

या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा सर्वांसमोर आला. जिल्हा परिषद निवडणुकीतील सत्तासंघर्षानंतर महायुतीतील कटुता कमी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी एकत्र राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांविरोधातच राजकीय ताकद पणाला लावली. अखेर भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

Satara Dcc Bank Election Results: Bjp 9, Ncp 8, Shiv Sena 4; Who Will Get The Chairman's Post?
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जिरायतीसाठी हेक्टरी 11 हजार,बागायतदारांना मिळणार 22 हजार; केंद्र सरकारनं मदतीचे निकष बदलले

निवडणुकीचा निकाल लागला असला, तरी जिल्हा बँकेतील सत्तेचा निकाल अजून बाकी आहे. भाजपकडे सर्वाधिक 9 जागा आहेत, तरी राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 4 संचालकही सत्तेच्या गणितात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? उपाध्यक्षपदासाठी कोणतं समीकरण जुळवलं जाईल? निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले महायुतीचे नेते आता सत्तेसाठी एकत्र येणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतूनच स्पष्ट होणार आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार योगेश फडतरे यांनी तब्बल १,८८३ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. या विजयासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे संचालक होण्याचा बहुमानही योगेश फडतरे यांनी मिळवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.