आमदारांच्या नाराजीनंतर आता राजीनामा सत्र सुरू; खासदाराचा तडकाफडकी राजीनामा, NC ला मोठा धक्का

Jammu kashmir Politics: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार रुहुल्ला यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. एका रॅलीदरम्यान त्यांनी पक्ष आणि आपल्या खासदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. हा राजीनामा एक मोठा धक्का मानला जातोय.
Ruhullah Mehdi Resignation Announcement: Fresh Political Setback For National Conference
Ruhullah Mehdi Resignation Announcement: Fresh Political Setback For National Conferencesaam tv
Published On: 
Summary
  • रुहुल्लाह मेहदी यांच्या घोषणेमुळे नॅशनल कॉन्फरन्सला मोठा धक्का

  • जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्समध्ये नेमकं काय सुरू आहे?

  • नॅशनल कॉन्फरन्सच्या खासदाराने पक्ष सोडण्याची घोषणा का केली?

जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच सरकार संकटात सापडलंय. पक्षातील २५ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना १४ अल्टीमेटम दिल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे श्रीनगरचे खासदार सैय्यद रुहुल्लाह यांनी पदासह पक्षातील सदस्यत्वाचा राजीमाना दिलाय. आज त्यांनी बडगाम येथे आपल्या वडिलांच्या, आगा सय्यद मेहदी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जाहीर सभेत भाषण केले. त्यानंतर आपल्या राजीनामा देणार असल्याची घोषणा केलीय.

सैय्यद रुहुल्लाह यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या दोघांनीही कलम ३७० च्या मुद्द्यावर जनतेला काही आश्वासने दिली होती, परंतु आता ते त्या आश्वासनांपासून माघार घेत आहेत. रुहुल्लाह हे दोनदा बडगाममधून आमदार राहिलेत. २०२४ मध्ये ते श्रीनगरमधून खासदार म्हणून निवडून आलेत.

आमदारांकडून पाठिंबा काढून घेण्याची धमकी

जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षात अंतर्गत राजकीय संघर्ष सुरू झालाय. पक्षाचे २५ आमदार बंडखोर झाले असून रविवारी त्यांनी पक्ष नेतृत्वाला १४ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत, तर उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा या आमदारांनी दिलाय.

अलीकडेच, आमदारांनी चार सदस्यांचे एक शिष्टमंडळ तयार केलंय. या शिष्टमंडळाचे नेतृत्व गुरेझचे आमदार नझीर अहमद गुरेझी आणि थानामंडीचे आमदार मुझफ्फर इक्बाल खान करत आहेत. हे शिष्टमंडळ पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. सध्या तरी आमदारांनी आपल्या अल्टिमेटमवर मिळणाऱ्या प्रतिसादाची प्रतीक्षा करण्याचा आणि त्यानंतरच पुढील कृतीबाबत निर्णय घेण्याचा निर्णय घेतलाय.

Ruhullah Mehdi Resignation Announcement: Fresh Political Setback For National Conference
विधानसभा निवडणुकीआधी ५ राज्यात मोठी घडामोड; SIR नंतर घटले २.२९ कोटी मतदार, युपीत किती मतदारांचं नाव झालं रद्द?

अपक्ष आमदाराला हटवले; ४ नवीन मंत्र्यांची नियुक्ती

विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर रोजी उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नॅशनल कॉन्फरन्सच्या चार आमदारांची यात अली मोहम्मद सागर, मीर सैफुल्ला, शमीमा फिरदौस आणि अल्ताफ अहमद कल्लू यांचा समावेश असून त्यांना मंत्रिपद देण्यात आलंय.

Ruhullah Mehdi Resignation Announcement: Fresh Political Setback For National Conference
MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

यासह अपक्ष आमदार सतीश शर्मा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. मात्र, नझीर अहमद गुरेझी आणि मुबारक गुल यांच्यासह अनेक ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळवण्यात अपयश आले. आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर, फारुख अब्दुल्ला यांनी मुबारक गुल यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. त्यांनी अली मोहम्मद सागर यांची जागा घेतली. दुसरीकडे आपल्याला डावलले गेल्याची भावना निर्माण झाल्यामुळे नझीर अहमद गुरेझी यांनी असंतुष्ट आमदारांसोबत हातमिळवणी केली, सरकारविरोधात मोहीम सुरू केली आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वाला अल्टिमेटम (अंतिम इशारा) दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.