विधानसभा निवडणुकीआधी ५ राज्यात मोठी घडामोड; SIR नंतर घटले २.२९ कोटी मतदार, युपीत किती मतदारांचं नाव झालं रद्द?

SIR Impact : SIRनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील एकूण मतदारांच्या संख्येत २.२९ कोटींची घट झाली आहे. यापैकी सर्वाधिक, म्हणजेच २.०४ कोटी मतदारांची घट उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आलीय.
2.29 crore voters reduced across five states after SIR
2.29 crore voters reduced across five states after SIRsaam tv
Published On: 
Summary
  • एसआयआरनंतर पाच राज्यांमध्ये २.२९ कोटी मतदारांची घट

  • उत्तर प्रदेशात एसआयआरनंतर २.०४ कोटी मतदारांची संख्या कमी

  • आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली

निवडणूक आयोगाने या पाच राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे अधिकारी संबंधित राज्यांचा दौरा करत आहेत. निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा बैठका घेत आहेत. ऑक्टोबर महिन्यात मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा बैठका घेण्यात आल्या. या बैठकांदरम्यान, निवडणुकीच्या सज्जतेशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेण्यात आलाय. या राज्यांमध्ये झालेल्या एसआयआरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेनंतर मतदारांच्या संख्येत मोठी घट दिसून आलीय. निवडणूक आयोग आणि या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या पाच राज्यांतील SIR प्रक्रियेपूर्वी सुमारे १८.७१ कोटी मतदार होते. अंतिम मतदार याद्यांमध्ये ही संख्या कमी होऊन सुमारे १६.४३ कोटींवर आलीय. म्हणजेच एकूण मतदारांच्या संख्येत सुमारे २.२९ कोटींची किंवा १२.२ टक्क्यांची घट झालीय.

2.29 crore voters reduced across five states after SIR
उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलाय. तेथे मतदारांच्या संख्येत सुमारे २.०४ कोटींची घट झालीय. या पाचही राज्यांमधील एकूण घटीच्या सुमारे ९० टक्के इतकी आहे. 'विशेष सखोल पुनरीक्षण' प्रक्रियेपूर्वी, उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदार होते. ड्राफ्ट मतदार यादीत ही संख्या कमी होऊन १२.५६ कोटींवर आली होती. मात्र, त्यानंतर अंतिम मतदार यादीत सुमारे ८४ लाख नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आली. यामुळे मतदारांची एकूण संख्या १३.४० कोटी झाली. या राज्यातील मतदार संख्येत एकूण १३.२४ टक्क्यांची घट झालीय.

पंजाबमध्ये SIR प्रक्रियेपूर्वी २.१५ कोटी मतदार होते. मसुदा मतदार यादीत ही संख्या १.९४ कोटींवर आली होती. त्यानंतर अंतिम मतदार यादीत सुमारे ७ लाख नावांचा पुन्हा समावेश केल्यामुळे एकूण मतदारांची संख्या २.०१ कोटी झाली. अशाप्रकारे, एकूण मतदारांपैकी १४ लाख मतदारांची निव्वळ घट एकूण संख्येच्या ६.३४ टक्के नोंदवण्यात आली. मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सुमारे २१ लाख नावांपैकी, नंतर सुमारे ३४ टक्के नावांचा पुन्हा समावेश करण्यात आलाय.

उत्तराखंडमध्ये झालेल्या SIR प्रक्रियेपूर्वी ८० लाख मतदार होते. ड्राफ्ट मतदार यादीत ही संख्या कमी होऊन ७१ लाख झाली. अंतिम मतदार यादीत ती ७२ लाख इतकी नोंदवली गेली. एकूणच मतदारांच्या संख्येत सुमारे ८ लाखांची निव्वळ घट झाली. ही संख्या १०.०७ टक्क्यांची घसरलीय. मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांपैकी केवळ ३ टक्के नावेच नंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहेत.

2.29 crore voters reduced across five states after SIR
१७ आमदारांच्या बैठकीनंतर बंडाच्या चर्चेला उधाण; इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष फुटणार?

गोवा आणि मणिपूरमध्येही मतदारांच्या संख्येत घट

मणिपूरमधील SIR प्रक्रियेपूर्वी सुमारे २०.९ लाख मतदार होते. ड्राफ्ट मतदार यादीत ही संख्या कमी होऊन १९.३ लाख झाली आणि त्यानंतर अंतिम मतदार यादीत ती १९.६ लाख इतकी नोंदवली गेली. एकूणच या राज्यात सुमारे १.३ लाख मतदारांची घट झालीय. जे ६.३३ टक्क्यांचे घट दर्शवते. मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांपैकी सुमारे १७ टक्के नावे नंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.