उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Uttar Pradesh Elections : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या तयारीचा निवडणूक आयोग आढावा घेणार आहे. २ नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये होणाऱ्या बैठकीत पश्चिम यूपीतील १८ जिल्ह्यांच्या तयारीची समीक्षा होणार आहे.
Up Election 2027: Election Commission To Review Preparations In 18 Districts
Up Election 2027: Election Commission To Review Preparations In 18 Districtssaam tv
Published On: 

मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे देशातील निवडणुकांमध्ये अनियमिता होत असल्याचा आरोप विरोधकांडून केला जातोय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन इंडिया आघाडीनं दिल्लीत आंदोलन केलं. दुसरीकडे युपीमधील निवडणुकांसाठी निवडणूक आयोग अॅक्शनमोडवर आलीय. निवडणुकांची तयारी कशी सुरू करण्यात आलीय, याचा चाचपणी केली जातेय.

Up Election 2027: Election Commission To Review Preparations In 18 Districts
शिंदेसेनेसोबतच्या वादानंतर भाजपचा मोठा निर्णय; 'स्थानिक' निवडणुका स्वबळावर, महिला नेत्याचा कार्यकर्त्यांना संदेश

भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी मेरठमध्ये आयोजित बैठकीत पश्चिम उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्यांमध्ये २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा उद्या म्हणजे २ नोव्हेंबर रोजी घेणार आहेत. वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग, निवडणूक आयोगाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, निवडणुकीशी संबंधित तयारीचा आणि जिल्हा प्रशासनाद्वारे झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील. दरम्यान या आढावा बैठकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) नवदीप रिनवा आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

ही समीक्षा बैठक सोमवारी सकाळी १०.३० वाजता, मेरठमधील साकेत येथील जेल चुंगी रोडवर असलेल्या 'ऊर्जा भवन' (पश्चिमंचल विद्युत वितरण निगमचे मुख्यालय) येथे आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत मेरठ, सहारनपूर, मुरादाबाद आणि अलीगड विभागांतर्गत येणाऱ्या १८ जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या जिल्ह्यांमधील निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. या जिल्ह्यात मेरठ, बागपत, बुलंदशहर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, सहारनपूर, मुझफ्फरनगर, शामली, अमरोहा, बिजनौर, मुरादाबाद, रामपूर, संभल, अलीगढ, एटा, हाथरस आणि कासगंज यांचा समावेश आहे.

Up Election 2027: Election Commission To Review Preparations In 18 Districts
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

संबंधित अधिकारक्षेत्रांतील विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक आणि उप-पोलीस महानिरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यात सहभागी होतील.आपल्या संबंधित जिल्ह्यांमधील निवडणूक तयारी आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या प्रगतीचा तपशील देणारी पॉवरपॉइंट सादरीकरणे तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.