१७ आमदारांच्या बैठकीनंतर बंडाच्या चर्चेला उधाण; इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष फुटणार?

Jammu and Kashmir Politics: श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या १७ आमदारांनी खासगी बैठक घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदारांनी पक्षाची कामे आणि मंत्रिमंडळातील खात्यांबाबत मागण्या केल्याच्या वृत्तांनंतर हंगामी अध्यक्ष शौकत मीर यांनी बंडाच्या अफवा फेटाळून लावल्या.
National Conference Rebellion Rumours: 17 Mlas Meeting In Srinagar, Party Issues Clarification
National Conference Rebellion Rumours: 17 Mlas Meeting In Srinagar, Party Issues Clarificationsaam tv
Published On: 
Summary
  • श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या १७ आमदारांची खासगी बैठक

  • या बैठकीनंतर पक्षात बंडाळी होण्याच्या चर्चांना उधाण

  • नॅशनल कॉन्फरन्सचे अंतरिम अध्यक्ष शौकत मीर यांनी बंडाच्या चर्चा फेटाळल्या.

इंडिया आघाडीकडून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला जातोय. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी देशभरात आंदोलन करत आहे. अशात इंडिया आघाडीचा भाग असलेल्या एका पक्षात बंड होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. श्रीनगरमध्ये काल नॅशनल कॉन्फरन्सच्या १७ आमदारांची एक खासगी बैठक झाल्याने राज्यातील राजकारणात खळबळ माजलीय.

आमदारांच्या बैठकीनंतर पक्षात बंडाळी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. यानंतर पक्षाचे अंतरिम अध्यक्ष शौकत मीर यांनी बंडाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पक्षाच्या १७ आमदारांनी काही मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती; ज्यामध्ये एका सल्लागाराला पदावरून हटवणे, मंत्रिमंडळातील चार सदस्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करणे आणि पक्षात अंतर्गत चौकशी सुरू करणे यांसारख्या मागण्यांचा समावेश होता.

National Conference Rebellion Rumours: 17 Mlas Meeting In Srinagar, Party Issues Clarification
शिंदेसेनेसोबतच्या वादानंतर भाजपचा मोठा निर्णय; 'स्थानिक' निवडणुका स्वबळावर, महिला नेत्याचा कार्यकर्त्यांना संदेश

१७ आमदारांच्या बैठकीबाबत स्पष्टीकरण

शौकत मीर यांनी पक्षात बंडखोरी किंवा गटबाजी झाल्याच्या वृत्तांचे स्पष्टपणे खंडन केलंय. आमदारांची अलीकडील बैठक ही एक अंतर्गत प्रक्रिया होती, जी लोकशाही संकेतांना अनुसरून होती. याचा अर्थ नेतृत्वाशी कोणताही संघर्ष असा होत नाहीये. तसेच मीर यांनी स्पष्ट केले की, पक्षाचे काही आमदार एका सौहार्दपूर्ण वातावरणात एकत्र आले होते. ज्यामध्ये त्यांनी आपापल्या चिंता आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा केली.

हे कोणतेही बंड नाहीये, उलट, आगामी आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ते एका अनुकूल वातावरणात एकत्र आले होते. कोणीही संघटना किंवा सरकारविरोधात कोणतेही विधान केलेले नाही. आमदारांनी आपल्या चिंता वरिष्ठ सदस्यांच्या माध्यमातून पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोशल मीडियावर या बैठकीचा चुकीचा अर्थ लावला गेला, असं शौकत मीर म्हणालेत.

National Conference Rebellion Rumours: 17 Mlas Meeting In Srinagar, Party Issues Clarification
महिलांसाठी मोठी बातमी! राज्यातील लोकप्रिय योजनेच्या नियमात बदल; अदिती तटकरेंची घोषणा

पक्षावर असमाधानी असलेल्या नेत्यांविषयी बोलताना, मीर यांनी माजिद लरावी, अब्दुल रहीम वीरी आणि नझीर अहमद गुरेझी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख केलाय. या नेत्यांनी नॅशनल कॉन्फरन्समध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून ते अजूनही संघटनेचे महत्त्वाचे सदस्य आहेत. पक्षाचे नेतृत्व आमदारांच्या अपेक्षांबाबत जागरूक आहे. भविष्यात संघटनात्मक किंवा राजकीय बदलांची शक्यता नाकारता येणार नसल्याचं शौकत मीर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.