शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जिरायतीसाठी हेक्टरी 11 हजार,बागायतदारांना मिळणार 22 हजार; केंद्र सरकारनं मदतीचे निकष बदलले

Modi Government Decision For Farmers: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. एनडीआरएफच्या सुधारित निकषात बदल करण्यात आलेत.
central government has revised the criteria for financial assistance provided to disaster-affected farmers under the NDRF
central government has revised the criteria for financial assistance provided to disaster-affected farmers under the NDRFsaam tv
Published On: 

राज्यातील नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे नुकसान सहन करणाऱ्या बळीराजासह आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिलाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं. त्याच दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या मदतीचे निकष केंद्र सरकारने बदललेत.

हे निकष बदलल्यामुळे त्याचा फायदा राज्यातल्या बळीराजाला होणार आहे. सुधारित मदतीचे हे निकष 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असणार आहेत. आर्थिक वर्ष 2026-27 पासून याची अंमलबजावणी होणार असून 1अप्रिल 2026 नंतर झालेल्या नुकसानीला सुधारित दर लागू होण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार जिरायती शेतकऱ्यांना हेक्टरी 11 हजार, बागायतदारांना 22 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

central government has revised the criteria for financial assistance provided to disaster-affected farmers under the NDRF
महिलांसाठी मोठी बातमी! राज्यातील लोकप्रिय योजनेच्या नियमात बदल; अदिती तटकरेंची घोषणा

शेती, फळबागा, पशुधन, कुक्कुटपालन आणि घरांच्या पडझडीसाठी मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेत भरीव वाढ केल्याने बाधितांना पूर्वीपेक्षा अधिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर झालाय. आर्थिक मदतीचे निकष बदलल्यामुळे दुष्काळग्रस्त आणि आपत्तीबाधितांना मिळणाऱ्या मदतीत मोठी वाढ झालीय. नव्या नियमांनुसार, जिरायत शेतीच्या नुकसानीपोटी मिळणारी मदत प्रति हेक्टरी 8,500 रुपयांवरून 11,000 रुपये, तर बागायत शेतीसाठी 17,000 रुपयांवरून 22,000 रुपये करण्यात आलीय. फळबागांच्या नुकसानीसाठी आता प्रति हेक्टरी 22,500 रुपयांऐवजी 30,000 रुपये मिळणार आहेत.

central government has revised the criteria for financial assistance provided to disaster-affected farmers under the NDRF
शेतकरी कर्जमाफी योजनेतून ९४ हजार शेतकऱ्यांना वगळलं; ४६ हजार ठरले अपात्र,काय आहे कारण?

आपत्तीमध्ये जनावरांची हानी झाल्यास त्यासाठीही सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. गाई, म्हशी, घोडा किंवा उंट यांसारख्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला तर भरपाई रक्कम 40,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आलीय. शेळी, मेंढी व डुकरासारख्या लहान जनावरांसाठी 4,000 ऐवजी 5,500 रुपये करण्यात आलीय.

गाढव आणि खेचर यांसारख्या ओझी वाहणाऱ्या प्राण्यांसाठी मदत 20,000 रुपयांवरून 25,400 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीय. कुक्कुटपालकांसाठी प्रति कोंबडी (100 कोंबड्यांपर्यंत) मदत 100 रुपयांवरून 130 रुपये करण्यात आलीय.

नव्या निकषांनुसार, नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास आता 4 लाखांऐवजी थेट 8 लाख रुपयांची मदत मिळेल. घरांच्या पडझडी झाली,तर घर पूर्णतः पडल्यास मिळणारी मदत 1 लाख 25 हजारांवरून 1 लाख 60 हजार रुपये, तर दुर्गम भागातील घरांसाठी 1 लाख 30 हजारांवरून 1 लाख 70 हजार रुपये करण्यात आलीय. घराच्या किरकोळ किंवा तात्पुरत्या पडझडीसाठी मिळणारी मदतदेखील वाढवण्यात आलीय. ही मदत 5,000 रुपयांवरून वाढवून 8,500 रुपये करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.