Poverty Reduction: भारताने करून दाखवलं! १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर, वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट

India's extreme poverty rate dropped to 2.6 percent : जागतिक बँकेच्या ऑक्टोबर २०२६ मधील अहवालानुसार, २०११ ते २०२३ या १२ वर्षांत भारतातील सुमारे ४९.६ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.
India's extreme poverty rate dropped
India's extreme poverty rate dropped
Published On: 

मागील १२ वर्षांत भारतातील सुमारे ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचे वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. २०११ मध्ये देशातील २७.१ टक्के लोकसंख्या अत्यंत गरिबीत जगत होती. हेच प्रमाण २०२३ मध्ये २.६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. या कालावधीत अंदाजे ४९.६ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडल्याची माहिती जागतिक बँकेच्या ऑक्टोबर २०२६ मधील ‘पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ अहवालात देण्यात आली आहे. एनडीटीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार भारतात गरिबी खूप वेगाने कमी होत आहे. देशातील तब्बल ४९.६ कोटी लोक गरिबीरेषेच्या बाहेर आले आहेत. तसेच देशातील श्रीमंत आणि गरिबांमधील संपत्तीची दरी (Income Gap) थोड्या प्रमाणात कमी होत आहे. हा अहवाल भारताच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक आहे. गरिबी कमी झाली असली तरी रोजगाराचा दर्जा, वेतनवाढ आणि आर्थिक संधींची उपलब्धता ही देशापुढील मोठी आव्हाने असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

India's extreme poverty rate dropped
MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय

२०११ मध्ये देशातील ५७.७% लोकसंख्या निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती. तर २०२३ मध्ये हा आकडा केवळ १६.१% पर्यंत कमी झाला. अहवालानुसार, अत्यंत गरिबीत म्हणजेच दिवसाला ३ डॉलर (सुमारे २५० रुपये) पेक्षा कमी उत्पन्नावर जगणाऱ्या लोकांची संख्या २०११ मध्ये २७.१% होती. ती २०२३ मध्ये कमी होऊन फक्त २.६% झाली आहे. मागील १२ वर्षांत देशातील अत्यंत कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे.

India's extreme poverty rate dropped
Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर कोसळले; दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू, Video आला समोर

भारतातील गरिबी फक्त उत्पन्नाच्या बाबतीतच नव्हे तर शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा यांसारख्या सुविधांच्या बाबतीतही कमी झाली आहे. OPHI नुसार २००५-०६ मध्ये भारताची ५३.८% लोकसंख्या गरिबीत जगत होती, २०१९-२१ पर्यंत हा आकडा १६.४% पर्यंत कमी झाला. दरम्यान, जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार २०२२-२३ मध्ये भारतातील गरिबीचा दर १५.५% होता.

देशातील गरिबी कमी झाली असली तरी उत्पन्नातील पूर्ण समानता अजून साधली गेलेली नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्या उत्पन्नात अजूनही मोठी दरी कायम आहे. जागतिक बँकेच्या ऑक्टोबर २०२६ च्या 'इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ' अहवालानुसार, देशातील सर्वात श्रीमंत १०% कामगार हे सर्वात गरीब १०% कामगारांपेक्षा सरासरी १३ पट अधिक कमावतात. मात्र, २०११ च्या तुलनेत गरीब आणि श्रीमंत यांच्यातील हे अंतर सध्या काही प्रमाणात कमी झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.