MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय

Nagpur MLC Result Update: विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. ५ पैकी फक्त २ जागांवर महायुतीला यश मिळाले. तर महाविकास आघाडीचा ३ जागांवर विजय झाला.
MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय
MLC ResultSaam Tv
Published On: 
  • विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला

  • विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल लागला

  • नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा विजय

  • अभिजीत वंजारी यांनी सुधाकर कोहळे यांचा पराभव केला

विधान परिषदेच्या पाचही जागांचा निकाल लागला असून मविआनं 3 जागांवर बाजी मारली. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चुरशीची लढत पाहायला मिळाली ती मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर. नागपुरात बंडखोरीचं आव्हान संपवूनही भाजपचा पराभव का झालाय? पाहूयात या रिपोर्टमधून...

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांचा निकाल जाहीर झालाय. मात्र, या 5 जागांच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली ती नागपूर पदवीधर निवडणुकीत. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यात तिरंगी लढत झाली. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या मतमोजणीत कधी काँग्रेसचे वंजारी आघाडीवर तर कधी भाजपचे कोहळे आघाडीवर होते. मात्र, काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेत भाजपकडून दुसऱ्यांदा विजय खेचून आणला.

MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय
MLC Election Result: विधान परिषदेच्या ५ जागांचा अंतिम निकाल जाहीर, मविआ ३ तर महायुतीला २ जागांवर यश; कुठे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय?

नागपूरात मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून भाजपचे माजी आमदार अनिल सोलेंची बंडखोरी शमवली. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. तर दुसरीकडे काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारींना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. इतकंच नव्हे तर नागपुरात मुख्यमंत्री, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचं प्रस्थ असतानाही भाजपला पराभवाचा धक्का बसलाय. भाजपच्या पराभवाची कारणे समोर आली आहेत.

MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय
MLC Result: विधानपरिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वादाची ठिणगी, भाजपने पराभवाचं खापर शिंदेसेनेवर फोडलं

मोठ्या प्रमाणातील अवैध मतांचा भाजपला फटका बसला. बंडखोरी शमवली असली तरी उमेदवाराबद्दल असलेली नाराजी दूर करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या पहिल्यासोबत दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या रणनीतीचा फटका बसला. अपक्ष उमेदवार नितेश कराळेंच्या उमेदवारीला गांभीर्यानं घेतले नाही. गेल्या काही दिवसांतील आंदोलनं, MPSC विरोधातील असंतोषाचा भाजपला फटका बसल्याची शक्यता आहे.

MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय
MLC Election Result: २८ जागांचा निकाल जाहीर! कुणाची बाजी अन् कुणाला धक्का? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

अपक्ष नितेश कराळेंनी 24,249 मते घेतल्याने पहिल्या पसंतीच्या आधारावर 75,438 मतांचा कोटा कुणालाही पूर्ण करता आला नाही. हेच भाजपसाठी अडचणीचं ठरलं आणि दुसऱ्या पसंतीच्या जोरावर काँग्रेसनं विजय मिळवला. हा विजय म्हणपरिवर्तनाची नांदी असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय.

काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच सलग दुसऱ्यांदा भाजपला धूळ चारलीये. गेल्या वेळी त्यांचा विजय झाला तेव्हा मविआची सत्ता होती. मात्र यावेळी महायुतीची सत्ता असतानाही त्यांनी भाजपला पराभूत केलं. त्यामुळे भाजपला हा पराभव जास्त जिव्हारी लागलाय. त्यामुळे आता भाजप काय रणनीती आखणार याबाबत उत्सुकता आहे.

MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय
MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.