MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत

MLC Election Result Update: विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील तणाव वाढला आहे. भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले. आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत
MLC Election Result UpdateSaam Tv
Published On: 
  • विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेसेनेत तणाव वाढला

  • भाजप महायुतीच्या पराभवानंतर पदाधिकारी आणि आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता

  • रवींद्र चव्हाण पुणे- नागपूर निवडणूक निकालाचा आढावा घेणार

गणेश कवडे, मुंबई

विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत पाचही जागा आपण जिंकू असा विश्वास महायुतीला होता. पण ५ पैकी २ जागा महायुतीला जिंकता आल्या तर ३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. या पराभवाचे खापर भाजपने शिंदेसेनेवर फोडले आहे. निवडणूक निकालानंतर महायुतीमधील तणाव चांगलाच वाढला आहे. या निकालानंतर भाजपने शिंदेसेनेवरील नाराजी बोलून देखील दाखवली. भाजप आता अॅक्शन मोडमध्ये आली असून कामचुकार पदाधिकारी, आमदार आणि मंत्र्यावर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अॅक्शन मोडमध्ये आहेत. नागपूर आणि पुण्यातील सर्व जिल्ह्यांचा ते लेखाजोखा घेणार आहेत. जिल्हाध्यक्ष, आमदार आणि मंत्री यांची ते झाडाझडती घेणार आहेत. भाजपच्या काही पदाधिकारी आणि मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही ठिकाणी पराभव नेमका का झाला याचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न ते करणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला जाणार आहे.

MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत
MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबरला दिल्ली दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची देखील भेट घेणार आहेत. महायुतीच्या मित्र पक्षांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अहवाल ते अमित शाह आणि नितीन नबीन यांना देणार आहेत. पराभवाचे संपूर्ण विश्लेषण रवींद्र चव्हाण अमित शाहांसमोर मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीतील पराभवामुळे आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत
MLC Election Result: विधान परिषदेच्या ५ जागांचा अंतिम निकाल जाहीर, मविआ ३ तर महायुतीला २ जागांवर यश; कुठे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय?

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदेसेनेवर निशाणा साधला. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली.'

MLC Result: पराभवानंतर महायुतीतला तणाव वाढला, भाजपच्या गोटात हालचालींना वेग; आमदार-मंत्र्यांवर कारवाईच्या तयारीत
MLC Election Result: २८ जागांचा निकाल जाहीर! कुणाची बाजी अन् कुणाला धक्का? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com