MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर

Marathwada Graduate MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालात शेवटच्या क्षणांत मोठा ट्विस्ट आला. शरद पवारांच्या उमेदवाराचा विजय झाला.
MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर
Marathwada graduate constituency MLC election results 2026Saam Tv
Published On: 
  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर

  • प्रतापसिंह पाटील यांचा १८ हजार १२४ मतांनी विजय

  • ४५ तासांच्या मतमोजणीनंतर मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा निकालाची घोषणा करण्यात आली

माधव सावरगावे, संभाजीनगर

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. पसंती क्रमानुसार ३९ उमेदवारांची वगळणी आणि मतहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली. निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.

निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे - चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.

MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर
Pune MLC Election Result: पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख यांचा विजय निश्चित, भाजपच्या स्मिता जाधव यांना टाकलं मागं

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसल्याने निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आली.

मतहस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते देण्यात आली. दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर ३९व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली.

MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर
MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर डॉ. प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. या टप्प्यावरही कोणत्याही उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला नव्हता. अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. डॉ. पाटील यांना १८ हजार १२४ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकृत निकाल जाहीर करून डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.

२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतिम निकाल घोषित होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, उमेदवारांची वगळणी, पुढील पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण, अंतिम आकडेवारीची तपासणी व निकाल निश्चिती या प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आल्या.

MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर
MLC Election: नागपूरमध्ये भाजपचा पराभव; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com