मोदी सरकारमधील बड्या नेत्याचं मंत्रिपद कन्फर्म, भाजपने राज्यसभेसाठी दिली उमेदवारी, कुठे लढणार निवडणूक?

Hardeep Singh Puri Rajya Sabha candidate from Madhya Pradesh : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना भाजपने मध्य प्रदेशातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले होते.
Hardeep Singh Puri Rajya Sabha candidate from Madhya Pradesh
Hardeep Singh Puri Rajya Sabha candidate from Madhya Pradesh
Published On: 

भरत मोहोळकर, दिल्ली प्रतिनिधी

Hardeep Singh Puri Rajya Sabha seat : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे चेहरे आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राज्यसभेवरील पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हरदीप सिंह पुरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले असून त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुरी यापूर्वी उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेचे प्रतिनिधित्व करत होते, आता ते मध्य प्रदेशमधून संसदेच्या वरच्या सभागृहात पोहोचणार आहेत.

Hardeep Singh Puri
Hardeep Singh PuriSAAM TV

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. यामुळे मोदी मंत्रिमंडळात त्यांचे स्थान कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

Hardeep Singh Puri Rajya Sabha candidate from Madhya Pradesh
पुण्यात धक्कादायक निकाल! पदवीधरमध्ये मोठा उलटफेर, तर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचा विजय निश्चित

काही दिवसांपूर्वी विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी न दिल्याने पुरी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले जाईल अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपने त्यांना राज्यसभेवर पुन्हा निवडून दिले नसते, तर ते मंत्रीपदी राहू शकले नसते. गेल्या अनेक दिवसांपासून मोदी सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. आता पक्षाने पुरी यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केल्यामुळे, ते मंत्रिमंडळात कायम राहू शकतात असा अंदाज बांधला जातोय.

Hardeep Singh Puri Rajya Sabha candidate from Madhya Pradesh
Supreme Court : संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; निखिल वागळेंची बिनशर्त माफी! कोर्टात नक्की काय घडलं?

माजी केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील ही जागा रिक्त झाली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ नोव्हेंबर आहे. पुरी हे मोदी मंत्रिमंडळातील एकमेव शीख मंत्री आहेत. मागील वेळी ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले होते. त्यांचा सध्याचा राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. यापूर्वी, जेव्हा भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली होती, तेव्हा त्यात हरदीप पुरी यांच्या नावाचा समावेश नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com