पुण्यात धक्कादायक निकाल! पदवीधरमध्ये मोठा उलटफेर, तर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचा विजय निश्चित

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे ६,७७० मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांनी स्मिता जाधव यांच्यावर आघाडी घेतली आहे.
Pune teachers constituency election counting results,
Pune teachers constituency election counting results,SaamTV
Published On: 

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune teachers constituency election counting results : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात मतमोजणीच्या २८ व्या बाद फेरीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी २३,११७ मते मिळवत आघाडी घेतली आहे, तर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना १६,३४७ मते मिळाली आहेत. या दोघांमध्ये सध्या ६,७७० मतांचा स्पष्ट फरक आहे. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघात ३४ बाद फेऱ्या पूर्ण झाल्या असून, हर्षदा देशमुख यांना १,११,५१० मते तर स्मिता जाधव यांना १,०२,६३४ मते मिळाली आहेत. हर्षदा देशमुख जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय.

कौस्तुभ गावडे यांची प्रतिक्रिया: "मी कुणावरही टीका केली नाही"

विजयाच्या उंबरठ्यावर असताना भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन आणि खांद्याला खांदा लावून काम केले जाईल. विरोधकांनी वयाचा मुद्दा उपस्थित करून टीका केली असली, तरी आपण कधीही कोणावर टीका केली नाही. आपण आपल्या कामातूनच टीकाकारांना उत्तर देऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली. महायुती म्हणून सर्वजण एकत्र काम करत आहेत आणि हा सुज्ञ शिक्षकांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे मी कोणाचा पराभव केला असे म्हणणार नाही, असेही ते म्हणाले.

मतदानाच्या २३ तारखेनंतर आता पैसे वाटपाचे आरोप केले जात आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी २३ हजारांपेक्षा जास्त मते मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवून माजी आणि आजी आमदारांच्या काळात झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Pune teachers constituency election counting results,
मोदी सरकारमधील बड्या नेत्याचं मंत्रिपद कन्फर्म, भाजपने राज्यसभेसाठी दिली उमेदवारी, कुठे लढणार निवडणूक?

कोल्हापुरात मोठा जल्लोष

या विजयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दारात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. कौस्तुभ गावडे हे राज्यातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून बहुमान मिळवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी 'साम टीव्ही'शी बोलताना सांगितले की, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मार्फत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहतील.

Pune teachers constituency election counting results,
Supreme Court : संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; निखिल वागळेंची बिनशर्त माफी! कोर्टात नक्की काय घडलं?

सचिन सानप यांची प्रतिक्रिया

दुसरीकडे, पराभवाच्या छायेत असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन, आम्ही कुठेतरी कमी पडलो." शिक्षकाचा आमदार शिक्षकच असला पाहिजे, या भूमिकेसाठी आपण पुढील काळातही लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत सर्व प्रकारचा वापर झाल्याचे सांगत, "आम्ही हरणारे नसून लढणारे आहोत," असा लढाऊ पवित्रा त्यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com