मतमोजणीत हायव्होल्टेज ड्रामा! नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची टक्कर, तर अमरावतीत शिक्षकांचा संताप, पुण्यात काय स्थिती?

Maharashtra Teacher and Graduate Elections: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या मतमोजणीत नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत, तर अमरावतीत मतपत्रिकेवर जुनी पेन्शन योजनेचा मजकूर लिहिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Maharashtra MLC election result 2026 latest updates
Maharashtra MLC election result 2026 latest updatessaam tv
Published On: 

Maharashtra Legislative Council Election Results 2026: महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू असून पहिल्याच फेरीत विविध केंद्रांवर राजकीय चुरस, आक्षेप आणि नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. नागपूरपासून अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत मतमोजणी दरम्यान रंजक आणि वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळत आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघ :

नागपूरमध्ये ८४ टेबलवर मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या २० टेबलवर भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. मात्र, मतमोजणीदरम्यान काही ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. मोजणीदरम्यान ८ मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे आक्षेप घेतला असल्याचे नितेश कराळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, "पहिल्या पसंतीत निकाल लागणार नाही, यासाठी दुसरी पसंतीची मतमोजणी करावी लागेल," असा दावा त्यांनी केला आहे.

मतदान प्रक्रियेत कर्मचारी अवैध मतं ग्राह्य धरत असल्याचा आक्षेप भाजप कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात अत्यंत अटीतटीची चुरस सुरू असून, तिसऱ्या क्रमांकावर बंडखोर उमेदवार नितेश कराळे मते घेताना दिसत आहेत.

एकूण मोजणी : नागपूर विभागात ४४५ मतदान केंद्रावरील ७८८ मतपेटीतून एकूण १,६५,७०५ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. तसेच ३४ पोस्टल मतपत्रिका बाद झाल्यानंतर एकूण १,६५,९०९ मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका एका फेरीत मोजल्या जात आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

सुधाकर कोहळे (भाजप)

अभिजित वंजारी (काँग्रेस - विद्यमान आमदार)

नितेश कराळे (अपक्ष / बंडखोर)

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ: वैध-अवैध मतपत्रिकांचे वर्गीकरण सुरू

पुण्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १०० टेबल मांडण्यात आले आहेत. मतपत्रिकांचे ५०-५० च्या संचामध्ये वर्गीकरण करून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळे करण्याचे काम वेगात सुरू आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघ

कौस्तुभ गावडे (भाजप)

जयंत आसगावकर (काँग्रेस - विद्यमान आमदार)

सचिन सानप (शिवसेना)

दत्तात्रय सावंत (अपक्ष)

पुणे पदवीधर मतदारसंघ

डॉ. स्मिता योगेश जाधव (भाजप)

हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष)

सुनील मोदी (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

Maharashtra MLC election result 2026 latest updates
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकाचवेळी १२ महत्त्वाचे निर्णय, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा पदवीधर): डॉ. प्रतापसिंह पाटील यांची आघाडी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी पार पडली. एकूण ५१५ पोस्टल मतांपैकी २१ मते बाद ठरली असून ४९४ मते वैध ठरली आहेत. सुरुवातीच्या ४९४ वैध मतांच्या मोजणीत आणि पहिल्या ३० मतांच्या आकडेवारीत डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत (त्यांना १३ तर सतीश चव्हाण यांना ११ मते मिळाली आहेत).

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघ

सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष)

दिलीप हरिभाऊ घुगे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

Maharashtra MLC election result 2026 latest updates
Good News: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! या योजनेच्या हप्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, शासन निर्णय जारी

अमरावती शिक्षक मतदारसंघ: मतपत्रिकेवर लिहिला 'जुनी पेन्शन'चा मजकूर

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या १४ टेबलवर पहिल्या पसंतीक्रमाच्या मतपत्रिका मोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, या मोजणीत एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अनेक शिक्षकांनी मतपत्रिकेवर 'जुनी पेन्शन योजना' आणि इतर विविध प्रकारचा मजकूर लिहिल्याची माहिती समोर आली आहे. अशा मजकूर लिहिलेल्या मतपत्रिका नियमानुसार बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ

किरण सरनाईक (शिवसेना समर्थित / अपक्ष)

आदिती पोहरे (काँग्रेस)

श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर / माजी आमदार)

शेखर भोयर (भाजप बंडखोर)

दिलीप कडू (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

दत्तात्रय लहाने (ठाकरे गट)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com