

Nilesh Lanke latest medical condition : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP MP) अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke Latest News) यांची प्रकृती अचानक खालावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात (Pune Private Hospital News) उपचारासाठी हलवण्यात येत आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून लंके यांच्यावर अहिल्यानगरमध्येच उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश लंके यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यामुळे तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबत वृत्त समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अहिल्यानगरवरून पुण्याकडे प्रवासादरम्यान डॉक्टरांची एक टीम त्यांच्यासोबत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.