Wardha News : वर्धेत बोगस बियाणे रिपॅकिंग करणा-या टाेळीचा पर्दाफाश, 1 कोटी 51 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त (पाहा व्हिडिओ)

एक ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
Wardha News, bogus seeds
Wardha News, bogus seedssaam tv

- चेतन व्यास

Wardha News : चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे बोगस कापूस बियाणे रिपॅकिंग करुन त्याच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत म्हसाळा येथे एका घरावर पाेलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 1 कोटी 51 लाख 82 हजाराचा मोद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिस या प्रकाराची कसून चाैकशी करीत आहेत.  (Maharashtra News)

Wardha News, bogus seeds
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार एका घरात गुजरात येथून आलेल्या बियाण्याच्या पोत्यातून छोट्या पाकिटात रिपॅकिंग केले जात हाेते. विविध नावांचे पाकीट तयार करून त्याची विक्रीसाठी प्रयत्न केले जात हाेते.

Wardha News, bogus seeds
Sting Opeartion In Kolhapur : गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी राजारामपुरीतील 'त्या' हाॅस्पिटलवर छापा, धक्कादायक प्रकार उघडकीस (पाहा व्हिडिओ)

पोलीस, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या संबंधित घरावर छापा टाकला. त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. कपाशीच्या बनावटी बियाणे विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर 296 पोते बियाणे जप्त करण्यात आले आहे. त्यासमवेत एक ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Wardha News, bogus seeds
Ratnagiri News : रत्नागिरीत भीषण पाणी टंचाई; युवकानं 10 लाख लिटर पुरवठा केला माेफत (पाहा व्हिडिओ)

सहा संशयित ताब्यात

मध्यरात्रीपासून पथक घटनास्थळावरच आहे. यामध्ये सुमारे 1 कोटी 51 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी (wardha) सेवाग्राम पोलिसांनी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com