Sting Opeartion In Kolhapur : गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी राजारामपुरीतील 'त्या' हाॅस्पिटलवर छापा, धक्कादायक प्रकार उघडकीस (पाहा व्हिडिओ)

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदानूसार संशयितांवर कारवाई केली जाणार आहे.
kolhapur news
kolhapur newssaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरातील राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर (gender diagnostic test in kolhapur) आज (साेमवार) शासकीय अधिका-यांनी छापा मारला. या छाप्यात समितीस श्री हॉस्पिटल येथे गर्भलिंग निदान केले जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिका-यांनी श्री हॉस्पिटलच्या कर्मचा-यांना पैशांसह ताब्यात घेतले आहे. या हॉस्पिटलमधील कर्मचा-यांची कसून चाैकशी करण्यात येत आहे. (Maharashtra News)

kolhapur news
Raju Shetti News : शासन आपल्या दारी अभियानाऐवजी भ्रष्ट्राचाराची गंगा दारोदारी अभियान राबवावे : राजू शेट्टी

कोल्हापुरातील श्री हॉस्पिटल इथं बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केली जाते अशी तक्रार शासनापर्यंत पाेहचली. त्यानंतर शासनाच्या समितीने या हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांची समितीस साथ मिळाली. त्या एका पेशंटच्या बहिण म्हणून दवाखान्यात येऊन त्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन केलं. त्यांना अंकिता आणि दिग्विजय कालेकर या दांपत्याची माेलाची साथ लाभली. या सर्वांनी मिळून श्री हॉस्पिटलचा भांडाफोड केला.

kolhapur news
Ashadi Ekadashi 2023 : टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांची पंढरपूरात गर्दी वाढू लागली, ऊन वारा पावसापासूनच्या संरक्षणासाठी पत्रा शेडची उभारणी

राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर समितीने छापा टाकला तेव्हा सोनोग्राफी मशीन बंद दाखवून गर्भलिंगनिदान केले जात असल्याचे स्पष्ट झाले. गर्भलिंग निदानसाठी हाॅस्पीटलमधील कर्मचा-यास 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदानूसार संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. रमेश जाधव (महापालिका, आरोग्य अधिकारी) यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com