Next Solar Eclipse India: भारतात पुढचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी दिसणार? जाणून घ्या तारीख आणि महत्त्वाची माहिती

Next Lunar Eclipse India: भारतात पुढील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी दिसणार, कोणत्या प्रकारचे असेल, सुरक्षितपणे ग्रहण कसे पाहावे आणि ग्रहणाची वेळ शहरानुसार कशी बदलू शकते याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Next Solar Eclipse India
Next Solar Eclipse Indiagoogle
Published On

सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाची वाट जगभरातले लाखो लोक करत असतात. सर्वांनाच या खगोलीय घटना पाहण्याची उत्सुकता असते. पण प्रत्यक्ष ग्रहण भारतातून दिसतंच असं नाही. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार ग्रहण कुठे दिसणार ते ठरतं.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात पुढचे सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. म्हणजे चंद्र सूर्याच्या फक्त काही भाग झाकेल. त्यामुळे सूर्य पूर्णपणे दिसेनासा होणार नाही. हे ग्रहण भारतातील अनेक भागांत दिसू शकते. मात्र शहरानुसार वेळेत थोडा फरक असू शकतो.

Next Solar Eclipse India
Naneghat Waterfalls: मुसळधार पावसाने खुललं नाणेघाटाचं सौंदर्य; धबधबे, धुकं अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

भारतात पुढेचे चंद्रग्रहण २० फेब्रुवारी २०२७ रोजी दिसणार आहे. हे उपच्छाया चंद्रग्रहण असेल. या वेळी चंद्र पृथ्वीच्या हलक्या सावलीतून जातो. त्यामुळे चंद्राची चमक थोडी कमी झाल्यासारखी वाटते. पण बदल सहज लक्षात येत नाही. यानंतर ६ जुलै २०२८ रोजी भारतात आंशिक चंद्रग्रहण दिसेल. या वेळी चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या गडद सावलीत जाईल. त्यामुळे हे ग्रहण जास्त स्पष्ट पाहता येतं.

सुर्यग्रहण पाहताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांचे संरक्षण करणारे खास ग्रहणाचे चष्मे किंवा सुरक्षित सोलर फिल्टर वापरल्याशिवाय सूर्यग्रहण पाहू नये. कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. मात्र चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित असते.

ग्रहण पाहण्याआधी आपल्या शहरात ते किती वाजता दिसणार आणि किती वेळ राहणार याची माहिती आधीच तपासून घ्यावी. त्यामुळे ही दुर्मिळ खगोलीय घटना जास्त चांगल्या प्रकारे अनुभवता येईल.

टीप : ही माहिती उपलब्ध खगोलशास्त्रीय गणनांवर आधारित आहे. ग्रहणाची वेळ आणि ते दिसण्याची स्थिती ठिकाणानुसार बदलू शकते. साम टिव्हीयाच्याशी समर्थन करत नाही.

Next Solar Eclipse India
Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com