Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Sakshi Sunil Jadhav

हार्ट अटॅकची समस्या

हॉर्ट अटॅक कोणालाही, कुठेही येऊ शकतो. ह्रदयाकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबला की ह्रदयाच्या स्नायूंचं नुकसना होतं.

Heart Attack Symptoms

शरीरावर होणारा परिणाम

तुम्ही हार्ट अटॅकवर वेळेच उपचार केले नाहीत तर तुमच्या ह्रदयाचं कायमचं नुकसान होऊ शकतं किंवा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दिसणाऱ्या काही सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Heart Attack Symptoms

छातीत दुखणे

सकाळी उठल्यानंतर छातीत जडपणा, दाब किंवा आवळल्यासारखं वाटत असेल तर ते हार्ट अॅटॅकचे लक्षण असू शकते. वेदना हात, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Attack Symptoms

रोज थकवा जाणवणे

रात्रभर झोपूनही सकाळी खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर ती सामान्य समस्या नाही. महिलांमध्ये हे हार्ट अॅटॅकचे सुरुवातीचे लक्षण मानले जाते.

Morning Heart Attack Signs

श्वास घेण्यास त्रास होणे

कोणतेही जड काम न करता धापा लागणे किंवा गुदमरल्यासारखे वाटणे हे धोक्याचे लक्षण आहे. हा त्रास छातीत वेदना किंवा घामासोबत होत असेल तर तातडीने रुग्णालयात जा.

Morning Heart Attack Signs

थंड घाम येणे

सकाळी उठताच कोणतेही कारण नसताना अंगावर थंड घाम येत असेल तर ते शरीराचा धोक्याचा इशारा असू शकतो. हा घाम छातीत दुखणे किंवा मळमळ यासोबत असेल तर उशीर करू नका.

Chest Pain

चक्कर येणे

अचानक चक्कर येणे किंवा उभे राहताना तोल जाणे ही सुद्धा हार्ट अॅटॅकची लक्षणे असू शकतात. अशावेळी इतर लक्षणेही दिसत असल्यास लगेचच वैद्यकीय मदत घ्या.

Heart Health

सकाळी मळमळ जाणवणे

रिकाम्या पोटी मळमळ होणे नेहमीच पचनाशी संबंधित असेल असं नाही. सतत मळमळ होत असल्यामुळे आणि त्यासोबत छातीत त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Health

टीप

हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. हार्ट अॅटॅकची शंका आल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Health

NEXT: Kidney : किडनी खराब होण्याआधी शरीर देते हे 5 इशारे; सकाळीच दिसतात ही लक्षणे

urine changes
येथे क्लिक करा