Low Blood Pressure: उन्हामुळे ब्लड प्रेशर अचानक लो होतोय? डॉक्टरांनी दिल्या या ५ सुचना, लगेचच घ्या जाणून

Summer Health: उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ शकतो. चक्कर, थकवा, मळमळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सोप्या उपायांनी लो बीपी नियंत्रणात ठेवता येते.
Low Blood Pressure
Hypotension Symptomsgoogle
Published On

सध्या थंडीचे दिवस सरताना दिसत आहेत. सकाळच्या १० वाजताच सुर्य डोक्यावर आलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनीच आणि विशेषता BPचा त्रास असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या दिवसात वाढत्या उन्हाळ्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर अचानक लो म्हणजेच कमी होऊ शकतो.

तुमच्या रक्तदाब हा कमीत कमी 90/60 ते 120/80 mm Hg असणं गरजेचं असतं. पण प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याचा इतिहास, वय आणि शारीरिक स्थितीनुसार रक्तदाबाची पातळी कमी जास्त असू शकते. जेव्हा रक्तदाब अचानक कमी होतो, तेव्हा अचानक चक्कर येते, थकवा येतो, डोळ्यासमोर अंधार येतो, मळमळ किंवा उलट्या होतात अशी लक्षणं तुम्हाला यामध्ये दिसू शकतात.

Low Blood Pressure
Samosa Batata Bhaji Recipe: समोस्यासाठी बनवा पिवळी बटाट्याची सुकी भाजी, वाचा संपूर्ण रेसिपी

पुण्यातील डॉ. सम्राट शाह, कन्सल्टंट फिजिशियन, Ruby Hall Clinic यांनी प्रसारित केलेल्या माहितीनुसार, लो BPची लक्षणं दिसत असतील तर काही साधे उपाय तातडीने करुन रक्तदाब नियंत्रणात आणू शकतो. त्यांच्या मते, सर्वात आधी शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी हळूहळू पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट ड्रिंक पिणं महत्वाचं आहे. अनेकदा डिहायड्रेशनमुळेही रक्तदाब कमी होतो.

तुम्ही या स्थितीत अचानक उभं राहू नका किंवा पटापट हालचाल करू नका. चक्कर येत असेल तर आधी थोडा वेळ बसून राहा आणि नंतर हळूहळू उभे राहा. जर जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थोडं मीठ असलेलं अन्न खा. त्याने रक्तदाब तात्पुरता वाढण्यास मदत होते. पण ज्यांना लो-सोडियम डाएट सांगितलं आहे त्यांनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका.

लो बीपी झालेल्या व्यक्तीच्या आसपास असणाऱ्यांनीही काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एखादी व्यक्ती अचानक फिकट दिसू लागली, चक्कर येत असल्यासारखी वाटली किंवा बेशुद्ध पडली तर तिला लगेच झोपवून पाय थोडे वर उचलून ठेवायला सांगा. यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. तसेच घट्ट कपडे सैल करा. जर ती व्यक्ती पूर्ण शुद्धीत असेल तर तिला पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट देऊ शकता.

तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, गोंधळलेली अवस्था किंवा वारंवार बेशुद्ध पडत असेल तर अशी गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांची मदत घ्या. अशा वेळी उशीर करणं धोकादायक ठरू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Low Blood Pressure
Liver Damage Symptoms: पायाला सारखी खाज सुटते अन् पाय चालताना दुखतात? लिव्हर खराब होण्याची ही ७ लक्षणे वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com