Samosa Batata Bhaji Recipe: समोस्यासाठी बनवा पिवळी बटाट्याची सुकी भाजी, वाचा संपूर्ण रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

बटाटे उकळून घ्या

सर्वप्रथम 4–5 मध्यम आकाराचे बटाटे उकळून त्यांची सालं काढा. नंतर बटाटे हलकेच हाताने मॅश किंवा छोटे तुकडे करून ठेवा.

Samosa Batata Bhaji Recipe

फोडणी तयार करा

कढईत 2 चमचे तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी आणि थोडी हिंग घालून छान फोडणी द्या.

Samosa Batata Bhaji Recipe

कांदा आणि हिरवी मिरची परतवा

फोडणीत बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Samosa Batata Bhaji Recipe

साले घाला

आता त्यात हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर आणि थोडे मीठ घाला. मसाले नीट परतून घ्या जेणेकरून चव छान येईल.

Samosa Batata Bhaji Recipe

बटाटे घाला

तयार मसाल्यात मॅश केलेले बटाटे घाला. सर्व मिश्रण चांगले एकत्र होईल असे हलक्या हाताने मिक्स करा.

Samosa Batata Bhaji Recipe

चव वाढवा

आता त्यात थोडा गरम मसाला, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घाला. यामुळे समोश्याच्या भाजीला हलकी आंबट आणि चटपटीत चव येते.

Samosa Batata Bhaji Recipe

कोथिंबीर आणि मटार घाला

नंतर उकडलेले मटार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. यामुळे भाजी अधिक चविष्ट आणि रंगीत दिसते.

Samosa Batata Bhaji Recipe

भाजी थंड होऊ द्या

भाजी तयार झाल्यावर ती थोडी थंड होऊ द्या. नंतर ही भाजी समोश्यामध्ये भरून कुरकुरीत समोसे तळू शकता.

Samosa Batata Bhaji Recipe

NEXT: Womens Day स्पेशल बायकोला द्या स्वस्तात मस्त गिफ्ट, वाढेल नात्यातलं प्रेम

budget gift ideas
येथे क्लिक करा