Sakshi Sunil Jadhav
बदलत्या जीवनशैली तुमच्या नकळत तुमच्या लिव्हरचं नुकसान होत असतं. तुम्ही याची पायावर दिसणारी पुढील लक्षणं ओळखून मोठ्या समस्येवर मात करु शकता.
पायांच्या तळव्यांमध्ये किंवा घोट्याजवळ अचानक सूज दिसत असेल तर ते लिव्हर नीट काम करत नसल्याचं लक्षण असू शकतं. शरीरात द्रव साचल्यामुळे अशी सूज येते.
जर लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरात काही विषारी पदार्थ साचतात. त्यामुळे त्वचेवर, विशेषतः तळव्यांमध्ये खाज सुटू शकते.
पायांची त्वचा पिवळसर, गडद किंवा रोजच्या पेक्षा वेगळी दिसत असेल तर ते शरीरातील बिलीरुबिन वाढल्याचं हे लक्षण असू शकतं.
पायांमध्ये नस जास्त उभ्या दिसत असतील, सूज किंवा वेदना जाणवत असतील तर हे सुद्धा काही वेळा लिव्हरच्या समस्येशी संबंधित लक्षण असू शकतं.
पायांमध्ये सतत वेदना, जडपणा किंवा थकवा जाणवत असेल तर ते शरीरातील अंतर्गत समस्येचे संकेत असू शकतात.
काही लोकांना पायांच्या तळव्यांमध्ये सतत जळजळ किंवा उष्णता जाणवते. ही समस्या जास्तवेळ राहिली तर लिव्हरच्या आरोग्याशी संबंधित असू शकते.
पायांची त्वचा खूप कोरडी पडत असेल, तडे जात असतील किंवा सोलल्या सारखी वाटत असेल तर हे लक्षण शरीरातल्या बिघाडाचं चिन्हं असू शकतं.
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासणी करून घ्या. योग्य वेळी उपचार घेतल्यास लिव्हरला होणारं गंभीर नुकसान टाळता येऊ शकतं.