प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा जीवघेना आजार आहे. हा कॅन्सर झाल्यानंतर पुरुषांचा मृत्यू होतो. आतापर्यंत हा आजार ५० वर्षांहून अधिक व्यक्तींना व्हायचा. मात्र नुकत्याच एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की हा कॅन्सर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना देखील होत आहे. दिल्ली यूनिक हॉस्पिटल कॅन्सर सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आशीष गुप्ता यांनी याबाबत माहिती सांगितली आहे.
WHO ने सांगितलेल्या आरडेवारीनुसार, साल २०२२ मध्ये भारतात ३७,९४८ प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण होते. या वर्षी १४ लाख नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी देशाच्या तुलनेत ३ टक्के इतकी आहे. या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीलाच समजली तर मृत्यूचा धोका फार कमी असतो, असं डॉ.गुप्ता यांनी सांगितलं आहे.
डॉ. गुप्ता यांनी पुढे म्हटलं की अमेरिकेमध्ये ८० टक्के व्यक्ती प्रोस्टेट कर्करोगातून बऱ्या झाल्या आहेत. मात्र भारतात हा आकडा अगदी उलट आहे. येथे झटपट रोगाचे निदान होत नाही.
लघवी करताना त्रास होणे
वारंवार लघवी येणे
रात्री सतत लघवी येणे
लघवी करताना रक्तस्त्रव होणे
लघवी केल्यानंतर पाठ आणि ओटीपोटात वेदना
डॉक्टरांनी पुढे या रोगापासून स्वत:ला दूर कसे ठेवावे याची देखील माहिती सांगितली आहे. त्यांनी म्हटलं की, या रोगापासून वाचण्यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेतली पाहिजे. ६ महिन्यातून एकदा तरी बॉडी चेकअप केलं पाहिजे. तसेच यातील एकही सौम्य लक्षण जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.