Mobile Use: मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो कॅन्सर? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Mobile Use Causes Cancer : सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, या मेसेजनुसार मोबाईलच्या अति वापरामुळे कॅन्सर होत असल्याचा दावा करण्यात आलाय.
Mobile Use: मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो कॅन्सर? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Mobile Use Causes Cancer
Published On

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

तुम्ही फोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सर होतो असा खळबळजनक दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे सगळ्यांचीच झोप उडालीय. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच मोबाईल वापरतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.

मोबाईलमध्ये सारखं सारखं पाहणं. त्याचा अतिवापर करणं जीवावर बेतू शकतं. वारंवार मोबाईल वापरल्यामुळे ब्रेन कॅन्सर होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. मात्र, हा दावा खरा आहे का? मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सर होतो का? मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात असतो. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच मोबाईल वापरतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची प़डताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात.

Mobile Use: मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो कॅन्सर? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Mental Health in Workplace: तुम्हालाही ऑफिसमध्ये वर्कलोड आहे? तज्ज्ञांचा हा सल्ला करेल टेन्शनमुक्त

व्हायरल मेसेज

मोबाईल फोनला सतत चिकटून राहण्याचे अनेक तोटे आहेत. मोबाईल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होऊ शकतो. स्मार्टफोनमुळे लहान मुले आणि तरुणांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या टीमने पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही वेबसाईट्स हाताळल्या. काही नॅशनल, इंटरनॅशनल हेल्थ रिसर्च पाहिले. त्यामध्ये असा कोणताही दावा आढळून आलेला नाही. मात्र, WHO नं मोबाईलमुळे ब्रेन कॅन्सरचा धोका नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

Mobile Use: मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो कॅन्सर? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Uterus cancer symptoms: गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष करतात महिला, शरीरात 'हे' बदल दिसेल तर वेळीच व्हा सावधान

व्हायरल सत्य आणि साम इन्व्हिस्टिगेशन

ब्रेन कॅन्सर आणि मोबाईल फोन यांच्यात कोणताही संबंध नाही

मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका नाही

मोबाईलमुळे श्रवण पेशीला धोका निर्माण होऊ शकतो

सतत मोबाईलच्या वापरामुळे डोकदुखी, अशक्तपणा जाणवतो

मोबाईलचा अतिवापर करू नये, यामुळे डोळ्यांना त्रास होतो

मोबाईलचा वापर हा मानवासाठी धोकादायकच आहे...मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढा वाईटही आहे...मात्र, मोबाईलमुळे कॅन्सर होतो हा दावा आमच्या पडताळणी असत्य ठरलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com