सचिन कदम, रायगड प्रतिनिधी
suspicious Pakistani boat spotted off Raigad coast : रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सगळीकडे तपासणी अन् नाकाबंधी लावण्यात आली आहे. बोटीची तपासणीही करण्यात येत आहे. बोट कुणी आणि का इथं लावली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बोटीमधून काही व्यक्ती समुद्रात उतरल्याचा संशय आहे. बोटीबाबत माहिती मिळताच जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू आहे. (Suspicious Boat Found Off Raigad Coast, Suspected to Be Pakistani)
बोटीतून अनेकजण उतरले -
रायगडमधील कोलाई बंदरात खोल समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या.
सुरक्षा यंत्रणाकडून मध्यरात्रीपासूनच संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.