10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

10 Hour Wok Rule by Telangana Government: तेलंंगणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कर्मचाऱ्यांना रोज १० तासांची शिफ्ट असणार आहे. आठवड्यात ४८ तास काम करावे लागणार आहे.
10 Hour Work Rule
10 Hour Work RuleSaam Tv
Published On

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शिफ्टचा कालावधी ८ तासांचा असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ८ तास काम करणे अनिवार्य आहे. मात्र, आता तेलगंणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने कमर्शियल ठिकाणी म्हणजे व्यावसायिक युनिट्ससाठी १० तास काम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचसोबत पूर्ण आठवड्यात ४८ तास काम करण्याची लिमिट सेट केली आहे. सरकारने यासंदर्भात ५ जुलै रोजी आदेश जारी केले आहेत.

10 Hour Work Rule
No Work Huge Pay: पठ्ठ्याला काम न करता मिळाले 26 लाख; कोर्टाचा एक निर्णय अन् कंपनीला दणका, वाचा सविस्तर

दिवसाला १० तास काम (10 hours Workday)

आता कर्मचाऱ्यांना दिवसाला १० तास काम करावे लागणार आहे आणि आठवड्याभरात कामाचे ४८ तास भरावे लागणार आहे. दुकाने आणि मॉल्ससाठीचे नियम वेगळे आहेत.

जास्त काम केले तर OverTime

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तेलंगणा सरकारने (Telangana Government) राज्यातील कामकाज अधिक सोपे व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. श्रम, रोजगार, प्रशिक्षण आणि कारखाना विभागाद्वारे हा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार, तेलंगणा दुकाने आणि आस्थापना कायदा, १९८८ अंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. यानुसार, व्यावसायिक क्षेत्रातील कामाचे तास १० तासांपेक्षा जास्त नसावेत आणि आठवड्यांच्या तासांची मर्यादा ४८ तास असावी. याचसोबत यापेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम दिला जाईल.

६ तासांनी अर्धा तासांचा ब्रेक

तेलंगणा सरकारच्या नियमांनुसार, जर १० तासांपेक्षा जास्त काम केले तर ओव्हरटाइम मिळणार आहे. ओव्हटाइम पकडूनदेखील कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. याचसोबत दर ६ तासांनी कर्मचाऱ्यांना ३० मिनिटांचा ब्रेक देणे आवश्यक आहे. या आदेश ८ जुलैपासून लागू करण्यात येईल.

10 Hour Work Rule
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

सरकारच्या मते, आठवड्यातून कामाच्या वेळेबाबतचा हा नवीन नियम राज्यात व्यवसायाला चालना देईल. याअंतर्गत आठवड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काम करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी ओव्हरटाइम लावला जाणार आहे. परंतु त्यांना तीन महिन्यात १४४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागणार नाही, असंही सांगण्यात येत आले. या अटींचे पालन केले नाही तर कंपनीला दिलेली सूट रद्द केली जाईल.

10 Hour Work Rule
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com