No Work Huge Pay: पठ्ठ्याला काम न करता मिळाले 26 लाख; कोर्टाचा एक निर्णय अन् कंपनीला दणका, वाचा सविस्तर

Salary without work : एकदिवसही काम न करता तुम्हाला कंपनीने कर्मचाऱ्याला 26 लाख रुपये पगार दिलाय..ही कुठली इमॅजिनरी गोष्ट नाहीये.... ही घटना खरंच घडलीय? मात्र काम न करणाऱ्या कर्मचाऱ्याला घरबसल्या इतका पगार का दिलाय? पाहूयात......
court
Salary witout work Saam tv
Published On

वैष्णवी राऊत, साम टीव्ही

कामावर न जाता घरबसल्य़ा कंपनीने पूर्ण पगार दिला, तर कुणासाठीही ही स्वप्नवत गोष्ट असेल. पण एका पठ्ठ्याचं नशीब खरंच असं फळफळलंय. एकही दिवस ऑफिसला न जाता त्याला तब्बल 5 महिन्यांचा पगार मिळालाय. किती? तब्बल 26 लाख! कुठे घ़डलाय हा अजब प्रकार?

हे घ़डलंय अबूधाबी कोर्टाच्या एका निर्णयाने. कोर्टाने एका कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याला पाच महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिलेत. विशेष तो कर्मचारी एक दिवसही कामावर गेला नव्हता. नेमकं काय घडलं?

court
Ajit Pawar : पुढच्या आषाढीला अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून महापूजा करावी; पक्षातील नेत्यांचं विठ्ठलाला साकडं, वाचा स्पेशल रिपोर्ट

- कंपनीने कर्मचाऱ्यासोबत कामाचा करार केला होता

- 11 नोव्हेंबर 2024 ते 7 एप्रिल 2025 दरम्यानचा करार होता

- करारानुसार, कंपनीला 7,200 दिरहमचा मूळ पगार द्यावा लागेल

- तर मासिक पेमेंट पॅकेज 24,000 दिरहम असेल

- पण कंपनीने कर्मचाऱ्यावा जॉईन करुन घेतलं नाही

- कर्मचाऱ्याने यासंदर्भात न्यायालयात याचिका केली

court
Shocking : हॉट एअर बलूनला भीषण आग, आकाशातून थेट जमिनीवर कोसळला; ८ जणांचा मृत्यू, भयानक व्हिडिओ

कराराचा विचार करून न्यायालयाने म्हटलं की, उत्पन्न करारासह सर्व कागदपत्रांवरून स्पष्ट आहे की, कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या नियुक्तीत विलंब झालाय. आणि कंपनीला आदेश दिला आहे की, ती कर्मचाऱ्याला 1 लाख 10 हजार 400 दिरहम म्हणजे तब्बल 26 लाख रुपये देईल.

कंपनीने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, कर्मचाऱ्याने सुरुवातीला रजा घेतली होती, ज्यामुळे त्याला कामावर बोलावले गेलं नाही. पण कोर्टाने कंपनीचं ऐकून घेत, 8 दिवसांचा पगार कापून उर्वरीत रक्कम द्यायचे आदेश दिलेत. म्हणून कंपनीला बसायचा तो भूर्दंड बसलाच आहे. पण यासगळ्यात कर्मचारी मात्र मालामाल झालाय.

court
Kalyan Dombivli : डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती तोडणार; पालिकेकडून पुन्हा नोटीस, हजारो नागरिक होणार बेघर?

म्हणतात ना, उपर वाला जब भी देता, देता छप्पर फाडके. बाबुमोशाय, 5 महिने पठ्ठ्याला पगार मिळाला नाही, पण मिळाला तेव्हा त्याच्यावर कुबेरच प्रसन्न झाला, असं म्हणावं लागले. आणि तोही कुठेलेही कष्ट न करता, एकही दिवस काम न करता!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com