
EPF Interest Credit Update : ईपीएफओच्या (EPFO) ८ कोटी खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे ८.२५ % व्याज EPF खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. तुम्हीही EPFO चे सदस्य असेल तर तुमच्याही खात्यात व्याज जमा झालेले असेल. तुम्ही पासबुकद्वारे ऑनलाइन बॅलन्स तपासू शकता. EPFO च्या काही खातेधारकांना आपल्या खात्यात व्याज दिसत आहे. तर काहींच्या खात्यात व्याज जमा होण्यस उशीर लागू शकतो. EPFO कडून व्याजासंदर्भात अधिकृत SMS किंवा ईमेल पाठवलेले नाहीत, पण पासबुकमध्ये व्याज जमा झाल्याचे अनेकांना दिसत आहे. (Employees' Provident Fund Organisation)
फेब्रुवारी २०२५ मध्ये EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती, त्यावर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलाय. या मंजुरीनंतर EPFO ने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा व्याजदर गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. खातेधारकांना आपल्या बचतीवर चांगला परतावा मिळत आहे.
कर्मचारी आणि कंपनीचे योगदान: प्रत्येक महिन्याला कर्मचारी त्याच्या मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतो. त्याचप्रमाणे संबंधीत कंपनीकडूनही कर्मचाऱ्याचे १२ टक्के जमा केले जातात. कंपनी जमा करत असलेल्या १२ टक्क्यांमध्ये ८.३३ टक्के पेन्शन योजनेत जमा होता, तर ३.६७ टक्के पीएफ खात्यात जातात.
EPFO कडून प्रत्येक महिन्याला व्याज मोजले जाते. पण ते आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा करण्यात येते. व्याज जमा करताना चक्रवाढ व्याजाचा वापर होतो. जून ते ऑगस्ट यादरम्यान कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होते.
epfindia.gov.in वर संकेतस्थळावर जा. त्यामध्ये passbook.epfindia.gov.in वर क्लिक करा.
UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यावर तुम्हाला सर्व मेंबर आयडी (मागील आणि सध्याच्या कंपनीसंदर्भात) दिसतील. सध्याच्या मेंबर आयडीवर क्लिक करा.
पासबुकमध्ये कर्मचारी योगदान, कंपनी योगदान आणि व्याजाची रक्कम वर्षानुसार दिसेल. तुम्ही पासबुक PDF स्वरूपात डाउनलोडही करू शकता.
जर तुमच्या जुन्या कंपनीचा मेंबर आयडी मर्ज नसेल, तर त्या खात्यात शून्य बॅलन्स दिसू शकतो. अशा वेळी EPFO पोर्टलवर ट्रान्सफरसाठी विनंती करा.
काहीवेळा व्याज जमा झाले तरी पासबुकमध्ये दिसण्यास वेळ लागतो. काही दिवस थांबून पुन्हा तपासा. तरीही व्याजाची रक्कम दिसत नसेल तर EPFO च्या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवा किंवा जवळच्या EPFO कार्यालयात भेट द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.