
Solapur ACP Caught Kicking BJP Leader in Public : सोलापूरमधील भाजप पदाधिकाऱ्याला सहाय्यक पोलीस आयुक्तांनी भर चौकात लाथ मारल्याची घटना समोर आली आहे. वाहतूक नियम मोडल्यामुळे लाथ मारल्याचं पोलिसांनी सांगितले, तर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप सोलापूर भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सोलापूरमध्ये या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस आयुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सोलापूर भाजपने केली आहे.
सोलापूर शहरातील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी भाजप अल्पसंख्यांक महामोर्चाचे पदाधिकारी जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणतेही ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्याला विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाजपने आरोप केला आहे. वाहतुकीचे कोणतेही नियम मोडल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. पण वर्दीचा धाक दाखवून मारहाण करण्याचे कारण काय? असा सवालही भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणात भाजपच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आलं असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताने भाजप पदाधिकाऱ्याला लाथ मारल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोलापूरमध्ये व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्ताविरोधात करावाई करण्याची मागणी करत भाजप अल्पसंख्याक आघाडीने पोलीस आयुक्ताना निवेदन दिले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याला का मारलं? याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.