Pakistan Karachi Building Collapse : पाकिस्तानमधील कराची शहरात एक पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये काही चिमुकल्याचाही समावेश आहे. शुक्रवारी सकाळी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली, अद्याप बचावकार्य सुरूच आहे. मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कराचीमधील ल्यारी परिसरात शुक्रवारी सकाळी ५ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ९ महिला, १५ पुरुष आणि १३, १० आणि १ वर्ष वयाची तीन मुले यांचा समावेश आहे. या इमारतीत सुमारे १०० जण राहत होते, अशी माहिती कराची पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारत ल्यारीच्या बागदादी परिसरातील फिदा हुसेन शेखा रोडजवळ असलेल्या लिआ मार्केट परिसरातील आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळण्याधी जोरात कटकटणारे आवाज ऐकू आले, त्यानंतर काही मिनिटात इमारत पत्त्यासारखी कोसळली. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मलब्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. बचाव पथकाला काही जणांना वाचवण्यात यश आळे आहे. त्या जखमींना कराचीमधील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर १० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर काही जखमींवर उपचार सुरू आहेत.
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने बचाव पथकांना घटनास्थळी पाठवले आणि मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केले गेले. या इमारतीला बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या नव्हत्या, असे तपासात उघड झाले आहे. शाह यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समित्या स्थापन केल्या आहे. कराचीतील जुन्या शहरातील 480 हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.