मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Bhandara youth loses life : भंडाऱ्यात रील बनवताना १७ वर्षीय तीर्थराज बारसागडेचा पाण्यात बुडून मृत्यू. मोबाईलमध्ये कैद झालेला थरार, सोशल मीडियाच्या हव्यासाचा आणखी एक बळी.
Bhandara youth loses life
Bhandara youth loses life while filming reel in water pit; tragic visuals captured by friends spark safety debate.Saam TV News Marathi
Published On

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

आजकालचे तरूण, तरूणी रीलसाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कधीही आणि कुठेही रील काढतात, त्यामुळे अनेकांचाजीव गेल्याचा प्रकारही समोर आले आहेत. भंडाऱ्यात रील बनविण्याच्या नादात तरुणाचा खड्ड्याच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली. या घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली असून रीलस्टारच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात एका १७ वर्षीय तरुणानं स्वतःचा जीव गमावला. ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये मित्रांनी चित्रीत केली. ही घटना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनेगाव शेतशिवारात घडली. तीर्थराज बारसागडे असं मृत तरुणाचं नावं आहे. मृतक तीर्थराज याला शेतशिवारात असलेल्या एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्याची रील बनवायची होती. हे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी दुसऱ्या भागात त्याचे मित्रे उभे होते. खोल खड्ड्यांचा अंदाज नसल्यानं तीर्थराज यानं पाण्यात उडी मारली. मात्र, खोल पाण्यात गटांगड्या खाऊ लागल्यानं त्यानं बुडतो वाचवा अशी शेवटची हाक मित्रांना मारली आणि मदत मिळायच्या आतचं तो पाण्यात बुडाला. हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद झाला. अड्याळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून घटनेचा पुढील तपास करीत आहे.

Bhandara youth loses life
WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

सोनेगाव येथील तिर्थराज बारसागडे हा कोंढा येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो गावातील दोघा मित्रांना घेऊन शेतात गेला. शेताजवळील बोडीच्या पाळीवर असलेल्या झाडावर चढला. आपल्या मित्रांना सेल्फी काढून व्हिडीओ बनविण्यास सांगितले. त्यावेळी त्याने झाडावर चढून बोडीतील पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न विफल ठरला.

रील बनवण्याच्या नादात लोक धोकादायक स्टंट, उंच ठिकाणांवर चढणे किंवा वाहन चालवताना बेफिकीरपणे व्हिडिओ शूट करतात. यामुळे अपघात, गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होऊ शकते. उदाहरणार्थ, रेल्वे ट्रॅकवर, उंच इमारतींवर किंवा वेगाने जाणाऱ्या गाडीत रील बनवताना अनेकदा दुर्घटना घडतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या हव्यासापोटी सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते. काही प्रकरणांत, तरुणांनी सेल्फी किंवा रील बनवताना उंचावरून पडून किंवा गाडीच्या अपघातात जीव गमावला आहे. सुरक्षितता प्रथम ठेवणे आणि कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे.

Bhandara youth loses life
मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com