Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Success Story of IPS Sachin Atulkar: आयपीएस सचिन अतुलकर यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस आणि आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच यश आयपीएस सचिन अतुलकर यांना मिळालं. त्यांनी २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

Success Story
Success Story : लहानपणी वडिलांचे छत्र हरपले, परदेशातील नोकरी धुडकावली; केली UPSC क्रॅक; IPS इल्मा अफरोज यांचा प्रवास

सचिन अतुलकर हे सोशल मीडियावरदेखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. २००६ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. सचिन अतुलकर यांची सर्वात तरुण आयपीएसपैकी एक ऑफिसर (IPS Officer) म्हणून निवड झाली.

IPS सचिन अतुलकर कोण आहेत? (IPS Sachin atulkar)

सचिन अतुलकर हे मूळचे मध्यप्रदेशमधील भोपाळचे रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब खूप सामान्य आहेत. त्यांना नेहमीच शिक्षण आणि मेहनती करण्याची सवय होती. त्यांचे वडील वीके अतुलकर भारतीय वन सेवामध्ये उप प्रभागीय अधिकारी होते.

सचिन यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले. त्यांनी बी.कॉम पदवी प्राप्त केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी २००६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी २५८ रँक प्राप्त केली.

Success Story
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! LLB केलं, छंद जपण्यासाठी संगीत विषयात MA, नंतर UPSC केली क्रॅक; IAS पल्लवी मिश्रा यांची यशोगाथा

सचिन अतुलकर यांनी अनेक पदांवर काम केले आहे. ते सध्या डीआजी म्हणून काम करत आहेत. याचसोबत ते त्यांची फिटनेसची आवडदेखील जपतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर फिटनेससंदर्भात व्हिडिओ पोस्ट करत असतात.

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन त्यांनी लाखो तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या प्रयत्नाचे त्यांना यश मिळाले आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com