Cyber Crime : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत मनी लॉण्ड्रिंगची भीती; डॉक्टरला ३१ लाखांचा गंडा

Jalgaon News : दिल्ली येथे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात अधिकारी असल्याचे सांगून तुमचे बँक खाते हे मनी लॉन्ड्रिंग साठी वापर झाल्याचे सांगितले. यात तीन वर्षांची शिक्षा होण्याची भीती दाखवली
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुक केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच घटना जळगावमध्ये समोर आली असून यात एका डॉक्टरला गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये सीबीआयमध्ये अधिकारी बोलत असल्याचे सांगत बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंग साठी पैसे वापरण्यात आल्याचे सांगत तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

चाळीसगाव तालुक्यातील एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. दरम्यान सायबर पोलिसांत दाखल तक्रारीनुसार १६ ते २३ जून २०२५ या कालावधीत सुनील कुमार नामक व्यक्तीने निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यात दिल्ली येथे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात अधिकारी असल्याचे सांगून तुमचे बँक खाते हे मनी लॉन्ड्रिंग साठी वापर झाल्याचे सांगितले. यात तीन वर्षांची शिक्षा होण्याची भीती दाखवली. 

Cyber Crime
Nashik : कमी पैसे मिळाल्याचे सांगत वृद्ध दाम्पत्याला लुबाडले; बँकेतील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

भीती दाखवून ३१ लाख ५० हजाराची रक्कम केली वर्ग 

तसेच या डॉक्टरला व्हॉटसॲप क्रमांकावर खोटे वॉरंट आणि नोटिसांचे कागदपत्र पाठवून त्यांना आणखी घाबरवले. यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने वेगवेगळे कारणे दाखवत डॉक्टरला भीती दाखवीत पैशांची मागणी केली. तसेच विविध कारणांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यातून ३१ लाख ५० हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे.  

Cyber Crime
Wardha Rain : पुराच्या पाण्यात शाळकरी मुलासह तिघेजण अडकले; मुसळधार पावसाने यशोदा नदीला पूर, बचाव पथक दाखल VIDEO

सायबर पोलिसात गुन्हा दाखल 

इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम बँक खात्यातुन वर्ग केल्यानंतर देखील समोरच्यांकडून पैशांची मागणी होत राहिली. मात्र घडल्या प्रकारात आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या निवृत्त अधिकाऱ्यांने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत संशयित गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com