
प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतही वय नसतं. यूपीएससी परीक्षा देण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा काही कारणांमुळे ते पूर्ण होत नाही. परंतु कितीही अडथळे आले तरीही आपण प्रयत्न केले पाहिजे. असंच काहीसं आयएएस पल्लवी मिश्रा (IAS Pallavi Mishra) यांनी केलं आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. एवढेच नाही तर अभ्यासासोबत त्यांनी आपला छंददेखील जोपासला आहे. त्यांनी संगीतमध्ये एम केलं आहे.
पल्लवी मिश्रा या मूळच्या मध्यप्रदेशच्या भोपाळच्या रहिवासी. त्यांनी सुरुवातीला एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर क्लासिकल संगीतमध्येही ट्रेनिंग घेतली. त्या एक मल्टी टॅलेंटड ऑफिसर आहेत.
पल्लवी मिश्रा यांनी सेल्फ स्टडी करत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी या परीक्षेत यश मिळवलेच. त्या सध्या आयएएस म्हणून कार्यरत आहेत.
आयएएस पल्लवी मिश्रा यांचे शिक्षण (IAS Pallavi Mishra Education)
पल्लवी मिश्रा यांनी भोपाळमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी २०२२ मध्ये झालेल्या यूपीएसी परीक्षेत ७३ रँक प्राप्त केली. त्यांचे वडील अजय मिश्रा हे सिनियर अॅडवोकेट आहेत. तर आई रेमु मिश्रा या सीनियर शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे मोठे भाऊ इंदोरमध्ये डीसीपी आहेत. पल्लवी या त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबियांना देतात.
संगीताची आवड (IAS Pallavi Mishra Hobbies In Singing)
आयएएस पल्लवी मिश्रा यांनी भोपाळमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत गेल्या. दिल्लीत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटमधून एलएलबीचे (LLB) शिक्षण पूर्ण केले. पल्लवी मिश्रा यांनी संगीतात खूप आवड होती. त्यासाठी त्यांनी लॉ डिग्री प्राप्त केल्यानंतर संगीतमध्ये एमए केले. त्या प्रशिक्षित क्लासिकल सिंगर आहेत.
पहिल्या प्रयत्नात अपयश (IAS Pallavi Mishra Inspiration Story)
पल्लवी मिश्रा यांना यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उलट दुसऱ्यांदा अजून मेहनत घेतली. याचाच चांगला फायदा त्यांना पुढच्या परीक्षेत झाला. त्यांनी खूप प्रॅक्टिस करुन हे यश मिळवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.