Jolly LLB 3 Release Date : अक्षय कुमार अन् अरशद वारसीच्या कॉमेडीचा तडका, 'जॉली एलएलबी ३'ची रिलीज डेट जाहीर

Akshay Kumar- Arshad Warsi Jolly LLB 3 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा आगामी चित्रपट 'जॉली एलएलबी ३'ची रिलीज डेट समोर आली आहे. ही जोडी प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाली आहे.
Akshay Kumar- Arshad Warsi Jolly LLB 3
Jolly LLB 3 Release DateSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'जॉली एलएलबी' चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही पार्टने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'जॉली एलएलबी'च्या दोन यशानंतर आता 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'जॉली एलएलबी 3'साठी खूप उत्सुक आहेत. अशात आता 'जॉली एलएलबी 3' ची रिलीज डेट समोर आली आहे.

'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अरशद वारसीने (Arshad Warsi) वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या दोघांनी 'जॉली एलएलबी'च्या पहिल्या दोन पार्टमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना हसायला लावले आहे. आता पुन्हा ही जोडी कोर्टरूममध्ये एकत्र येत आहे. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' हा 19 सप्टेंबर 2025ला रिलीज होणार आहे. 'जॉली एलएलबी 3'च्या घोषणेपासून चाहते चित्रपटासाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत होते. 'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचे चित्र सध्या समोर दिसत आहे. 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाच्या रिलीज डेटची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'जॉली एलएलबी 3' चे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार जॉली मिश्रा आणि अरशद वारसीन जॉली त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'जॉली एलएलबी 2' हा चित्रपट 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, अन्नू कपूर, हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, सयानी गुप्ता आणि मानव कौल ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. चित्रपटात भन्नाट कॉमेडी पाहायला मिळाली आहे.

Akshay Kumar- Arshad Warsi Jolly LLB 3
Dhanashree Verma : घटस्फोटाच्या प्रश्नावर धनश्री वर्मा काय म्हणाली? उत्तर वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com