UPSC Exam Timetable: यूपीएससी परीक्षेचं वेळापत्रक समोर, २०२६ मध्ये होणाऱ्या २६ परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा सविस्तर

UPSC Exam 2026 Timetable: यूपीएससी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यामध्ये २०२६ मध्ये होणाऱ्या २७ परीक्षांच्या तारखा दिलेल्या आहेत. यानुसार तुम्हाला अभ्यास करता येणार आहे.
UPSC Exam Timetable
UPSC Exam TimetableSaam Tv
Published On

केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC)ने पुढच्या वर्षातील सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यूपीएससीने २०२६ मध्ये होणाऱ्य २७ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. यामध्ये UPSC सिविल सर्व्हिस परीक्षा २०२६ प्रिलियम्स, यूपीएससी मेन्स, सीडीएस, एनडीए, इंजिनियरिंग सर्विस, सीबीआयसह अनेक परीक्षांची माहिती देण्यात आली आहे.

जर तुम्ही यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हे वेळापत्रक नक्की बघा. या वेळापत्रकाच्या आधारावर तुम्हाला कधी कोणती परीक्षा द्यायची आहे हे कळेल. यानुसार तुम्ही अभ्यास करु शकतात.

UPSC Exam Timetable
Indian Navy Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

२०२६ मध्ये यूपीएससी परीक्षेची अधिसूचना १४ जानेवारी २०२६ रोजी जारी केली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थी ३ फेब्रुवारीपासून अर्ज करु शकणार आहेत. यूपीएससी प्रिलियम्स परीक्षा २४ मे रोजी होणार आहे. यानंतर UPSC CSE मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. याचसोबत UPSC NDA-I आणि CDS-I भरतीची जाहिरात १० डिसेंबर २०२५ रोजी जाी केले जाईल. यानंतर १२ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे.

UPSC RT परीक्षा १० जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. कंबाइंड जियो सायंटिस्ट परीक्षा ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. इंजिनियरिंग सर्विस प्रीलियम्स परीक्षादेखील ८ फेब्रुवारीला होणार आहे. सीबीआई (DSP) एलडीसीई परीक्षा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. CISF एसी (कार्यकारी) एलडीसीई परीक्षा ८ मार्च २०२५ रोजी होणार आहे.

UPSC Exam Timetable
Bank Jobs: इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची संधी; ४०० पदांसाठी निघाली भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

यूपीएससी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करता येईल. यामध्ये एकूण २७ परीक्षांच्या तारखा दिल्या आहेत. कोणती परीक्षा कधी होणार याबाबत माहिती दिली आहे.

UPSC Exam Timetable
Success Story: वडील बस ड्रायव्हर, लेकीने क्रॅक केली UPSC; IAS प्रिती हुड्डा यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com