
चेतन व्यास, साम टीव्ही
वर्धा : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील अडूसष्ट वर्षाच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजीचं सर्वत्र कौतुक होत असून आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या इंदूताई यांना ५१ टक्के गुण मिळाले आहे. तर नातू धीरज याला ७१ टक्के गुण मिळाले आहे. एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले आणि पासही झाले आहेत. केवळ सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आले नाही. पण वयाच्या ६८व्या वर्षी इंदूताईना प्रथम संस्थेकडून सेकंड चान्स मिळाला आणि त्यांनी दहावीची परीक्षा देत यश मिळवलं आहे.
गावात कोणताही काम असो त्यात यांचा नेहमी पुढाकार असतो. या सध्या बचत गटाच्या अध्यक्ष असून पूर्वी तंटामुक्ती समितीत होत्या. इंदुताईंचं माहेरी सातवीपर्यंत शिक्षण झाले होते आणी त्यानंतर लग्न झाले. शिकण्याची इच्छा असतानाही शिकता आले नाहीय परंतु गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कडून सेकंड चान्स नावाचा कार्यक्रम सुरु झाला. या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सेकंड चान्स देत दहावीची परीक्षेची तयारी करून घेतली. त्यांना परीक्षेला बसविलं. त्यात इंदूताई यांनी देखील वर्षभर दहावीच अभ्यास करत परीक्षा दिली. इंदूताई सोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा सुचली, म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केलीय.
आजीसोबत नातू एकच केंद्रावर परीक्षेला बसले आणी पास झाले. नातू धीरजला ७१ टक्के गुण मिळाले तर आजीला ५१ टक्के गुण मिळाले. आजीला पहिले पासून शिक्षणाची आवड होती त्यात ही संस्था गावात आली आणी आजीचं स्वप्न पूर्ण झालं. आजीला शिक्षणात मी आणी माझी बहीण सुद्धा मदत करत होतो. आम्हाला शिक्षकांच सहयोगही चांगला लाभला असं नातू धीरज बोरकर यांनी सांगितलय.
हिंगणघाट तालुक्यात प्रथम एज्युकेशन सोसायटी मार्फत आम्ही सेकंड चान्स नावानं एक प्रोग्राम सुरु केला. यात वेगवेगळे क्लस्टर तयार करून ज्यांनी शिक्षण सोडल आणी ज्यना शिक्षणाची आवडत आहे अश्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सुरु केल. जामनी येथे सुद्धा आम्ही असाच प्रकार केला. सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा द्यायला लावली. यांना शिक्षणही दिले आणी त्यात यश सुद्धा आले. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी हा उद्देश समोर ठेऊन संस्था काम करत आहे असं या संस्थेचे जिल्हा समन्वयक यांनी सांगितलय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.