Buldhana Crime : आईचं छत्र हरपलेलं, पोरीला ५० रुपयांचं आमिष दिलं, नराधमाचा चिमुकलीवर अतिप्रसंग; बुलढाणा हादरलं

Khamgaon Rape of Minor Girl : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगावराजा येथील पेठ पुरा परिसरात राहणारी केवळ साडेनऊ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Buldhana Khamgaon Minor girl assault
Buldhana Khamgaon Minor girl assaultSaam Tv News
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगावराजा येथील पेठ पुरा परिसरात राहणारी केवळ साडेनऊ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी रेहान खान मुक्तार खान (वय २४ ते २५) याचे अंडा आणि चिकन सेंटर असून चिमुकलीला ५० रुपयांचं आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला आई नसून वडील मोल मजुरीचं काम करतात. घटनेतील आरोपी फरार झाला होता, त्याला शोधण्यासाठी तीन टीम रवाना करण्यात आल्या आणि नांदुरा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच चिमुकलीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केलं असून वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यात नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग

दरम्यान, पुण्यातील पिंपरीमध्ये देखील एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील पिंपरी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी १३ मे ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत नेत निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी नेत असताना तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा चावाही घेतला.

Buldhana Khamgaon Minor girl assault
Pune Crime News : पुण्यात नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेला अडवलं, तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेलं; चावाही घेतला पण...

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत, बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली. १३ मेच्या रात्री ११च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत. २७ वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित महिला हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहोचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस नेलं. तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

महिलेने जोरदार प्रतिकार केला, आरोपीला चावा देखील घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आणि पकडण्यात चाकण पोलिसांना यश आलं. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असं काही कृत्य केलंय का? याचा तपासही केला जात आहे.

Buldhana Khamgaon Minor girl assault
Pune Crime : अंगावर मारल्याचे घाव, रक्ताने माखलेली ओढणी, पुण्यात नवरा-बायकोचा मृत्यू; प्रकरणाचं गूढ उलगडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com