Pakistan Cyber ​​Attack
Pakistan Cyber ​​Attack

India vs Pakistan: पाकिस्तानची नवी कुरापत; भारतीय लष्कराची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न

Pakistan Cyber ​​Attack : पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून भारतीय लष्कराची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published on

भारत लष्कर करावाई करेल अशी भीती पाकिस्तानला आहे. तरीही पाकड्यांचे कुरापती कमी होताना दिसत नाहीत. घाबरलेल्या पाकिस्तानकडून सायबर हल्ला करण्यात येत आहे. भारतीय लष्कराची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झालाय. मिळालेल्या महितीनुसार, गेल्या दोन दिवसांत दोनदा वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाकड्यांचा नापाक प्रयत्न भारतीय तंत्रज्ञान तज्ञांनी हाणून पाडलाय.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. तर लष्कर-ए- तोयबाचे दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त करण्यात आली आहेत. दहशतवादी हल्यानंतर भारत आपल्यावर लष्करी कारवाई करेल,अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे पाकिस्तान लष्करी पीओकेमधील दहशतवाद्यांचे तळ तेथून हलवले जात आहेत.

भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर कारवाई केलीय. आणि त्यांचे सोशल मीडियावरील एक्सचं खाते ब्लॉक केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताविषीय गरळ ओकली होती. त्यात त्यांनी भारत कधीही लष्करी करवाई करेल. अशा परिस्थितीत सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय. ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सरकारला माहिती दिली आहे, त्यानंतर पाकिस्तान सतर्क झालाय.

त्याआधी पाकिस्तानी सैन्याने सलग पाचव्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, त्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिलेत. भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, '२८-२९ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही चिथावणीशिवाय, कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर (एलओसी) तसेच अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com