Bank Jobs: इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची संधी; ४०० पदांसाठी निघाली भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Indian Overseas Bank Recruitment: इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ओव्हरसीज बँकेत ४०० रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Indian Overseas Bank Recruitment
Indian Overseas Bank RecruitmentSaam Tv
Published On

बँकेत नोकरी करायची अनेकांची इच्छा असते. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत ४०० पदांसाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून म्हणजे १२ तारखेपासून सुरु झाली आहे. (Indian Overseas Bank Recruitment)

Indian Overseas Bank Recruitment
Indian Army Recruitment: इंडियन आर्मीत नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; मिळणार पगार २ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

इंडियन ओव्हरसीज बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी लवकरात लवकर अर्ज करावेत.यासाठी तुम्ही ibpsonline.ibps.in/ioblboapr25/ या पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेत ४०० रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. विविध राज्यांमध्ये ही भरती होणार आहे.महाराष्ट्रात एकूण ४५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Indian Overseas Bank Recruitment
Bank Jobs: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; इंडियन बँकेत भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ibpsonline.ibps.in/ioblboapr25/ या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर माहिती भरा. त्यानंतर सही आणि फोटो अपलोड करा. यानंतर शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करा.

Indian Overseas Bank Recruitment
Bank Of Baroda Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदात निघाली भरती; पगार ३७००० रुपये; आजच अर्ज करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com