
भारतीय नागरिक अजूनही मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. आरोग्य, शिक्षण आणि मुलभूत हक्क या माणसांच्या आवश्यक गरजा आहेत. सरकार या महत्वाच्या गरजांबद्दल मदत करताना अद्याप पाहायला मिळत नाहीये. अजुनही रस्त्यात खड्डे, पाण्याची समस्या, वीजेची समस्या नागरिकांना सहन करावी लागत आहे. तसेच नागरिकांना त्यामध्ये विशेषत: गरोदर महिलांना आसपास वाहतूक, रस्ता आणि रुग्णालय नसल्यामुळे झोळी करून लांबच्या रुग्णालयात न्यावे लागत आहे.
नागरिकांनी आता स्वत:च त्यांच्या समस्येवर उपाय काढला आहे. नुकताच भामगरागड गडचिरोली येथे स्थायिक तीन विद्यार्थ्यांनचा नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परिक्षेमध्ये तीनही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता ते गावामध्ये डॉक्टर होणार आहेत. शहरात राहून उच्च शिक्षण घेणं त्यांना शक्य नव्हतं. मात्र त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मागासवर्गीय आदिम जमातींपैकी एक असलेल्या गावासाठी कौतुकास्पद कामगिरी केली.
दुर्गम गडचिरोलीच्या भामरागडमध्ये कोणत्याच सुविधा नसताना त्यांनी शिक्षण पुर्ण केले. १४ जून मध्ये नीट परिक्षेच्या निकालात यांनी आपली चमक दाखवली. या उत्तीर्ण विद्यार्थांची नावे आणि गुण पुढील प्रमाणे आहेत.
देवदास मंगू वाचामी 472 गुण
सानिया तुकाराम धुर्वे ३६४ गुण
गुरुदास गिसू मिच्चा ३४८ गुण
सानिया आणि गुरुदास या दोन विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण आदिवासी विकास विभागात झाले. हे ठिकाण सिरोंचा येथे आहे. या तीनही विद्यार्थ्यांनी धाराशिवच्या 'उलगुलान' येथून नीट परिक्षेचे मार्गदर्शन मिळवले. त्यांच्या घरची परिस्थिती व्यवस्थित नसताना त्यांनी हा विजय मिळवला आहे. शहरात शिकण्याची संधी नसतानाही त्यांनी धाराशिव येथून मार्गदर्शन घेतलं आणि भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे.