
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये बाडमेरमधील धर्माराम चौधरी नावाचे शेतकरी राहतात. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीसोबतच ते बालोतरा येथील एका कारखान्यात मजुरीचं कामही करतात. त्यांच्या घरातील परिस्थिती हलाखीची आहे आणि त्यांना आर्थिक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत, त्यांचा मुलगा जयप्रकाश याने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्माराम यांनी कर्ज काढण्याचा निर्णय घेतला.
धर्माराम यांनी कर्ज घेतलं आणि जयप्रकाशला कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवलं. जयप्रकाशने दोन वर्षे खूप मेहनत केली. तो नीट परीक्षा पास झाला. त्याला अहमदाबादच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण एका विमान अपघाताने जयप्रकाशच्या कुटुंबाचं स्वप्नावर विरजण पडलं. MBBSच्या ऍडमिशनसाठी जयप्रकाशने दोन वर्षे कोटा येथे NEETची तयारी केली. २०१३मध्ये त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याने ६७५ गुण मिळवून नीट परीक्षा पास केली. जयप्रकाश आणि त्याच्या आईचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. तो बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये MBBSचं शिक्षण घेत होता. तो आता दुसऱ्या वर्षाला होता. काही दिवसांपूर्वी 'ऑपरेशन सिंदूर' झालं, तेव्हा जयप्रकाश आपल्या गावी आला होता. त्याची परीक्षा जवळ होती, त्यामुळे तो परत कॉलेजला गेला. पण नियतीला काही औरच मान्य असेल. एका विमान अपघाताने मेडिकल हॉस्टेलमध्ये जेवण करत असलेल्या अनेक विद्यार्थी आणि लोकांचा जीव घेतला. त्यात जयप्रकाशचाही समावेश होता.
शेवटचं बोलणं वडिलांशीच
गुरुवारी १२ जून रोजी दुपारी १ वाजता जयप्रकाशचं आपल्या वडिलांशी बोलणं झालं. त्याने वडिलांना सांगितलं की, 'आता तो लायब्ररीतून बाहेर जाऊन हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवण करायला जात आहे.' जयप्रकाशने हे पण सांगितलं की, त्याच्या मोबाईलची चार्जिंग संपली आहे. त्यामुळे तो संध्याकाळी पुन्हा फोन करेल. यानंतर अर्ध्या तासातच तो अपघात झाला. २० वर्षांचा जयप्रकाश ४० टक्के भाजला होता. हॉस्टेलच्या इमारतीचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला होता. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मित्रांसोबत गेला असता तर...
जयप्रकाशचे नातेवाईक मंगला राम यांनी सांगितलं की, 'जयप्रकाश सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या मित्रांसोबत लायब्ररीत अभ्यास करत होता. दुपारी १२:३० वाजता त्याचे काही मित्र लायब्ररीतून बाहेर पडले. ते फळं खायला जाणार होते. मित्रांनी जयप्रकाशला विचारले की, 'चल, आपण बाहेर जाऊन आंबे घेऊन येऊ.' पण जयप्रकाशने बाहेर जाण्यास नकार दिला. तो म्हणाला की तो हॉस्टेलच्या मेसमध्ये जाऊन जेवण करेल. त्याचे काही मित्र लायब्ररीतून बाहेर गेले. अर्ध्या तासानंतर जयप्रकाश जेवण करण्यासाठी मेसमध्ये गेला. तो आपल्या इतर मित्रांसोबत जेवण करत असतानाच विमान अपघात झाला. या अपघातात हॉस्टेलमधील २४ लोकांचा मृत्यू झाला, ज्यात जयप्रकाशचाही समावेश होता. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. जयप्रकाशच्या जाण्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याचं तथा त्याच्या कुटुंबाचं त्याला डॉक्टर होताना बघण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.