Ahilyanagar News: पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म

Tribal Woman Gives Birth on Jungle: गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेची जंगलातच उघड्यावर प्रसूती करण्यात आली.
ahilyanagar
ahilyanagarSaam
Published On

गावात पोहोचायला रस्ता नसल्यामु‌ळे एका आदिवासी महिलेची प्रसुती जंगलातच करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जांभळे गावच्या शिवारात घडली असून, स्थानिकांच्या मदतीने महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रात पोहचवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतीक्षा दशरथ मधे असे महिलेचं नाव आहे. या अकोले तालुक्यातील जांभळे गावाच्या ठाकरवाडीतील रहिवासी आहेत. गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने स्थानिक मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे यांच्याशी संपर्क साधला. गवांदे यांनी चारचाकी वाहन घेऊन ठाकरवाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वाडीपर्यंत जाणारा रस्ता चिखलमय झाल्यामुळे वाहन वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे प्रतीक्षा यांना पायी चालत आणत असताना रस्त्यातच प्रसूती झाली.

ahilyanagar
Shocking Crime: काम देण्याच्या बहाण्याने गुजरातला नेलं, अडीच लाखांत तरूणीची विक्री अन् लग्न लावून दिलं; शेवटी युवतीने..

यानंतर, मुख्याध्यापक गवांदे यांच्या मदतीने तिला मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले आणि तेथून ॲम्ब्युलन्सद्वारे ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्रात पोहोचविण्यात आले. सुदैवाने, बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.

या घटनेनंतर ठाकरवाडीच्या रस्त्याच्या दयनीय स्थितीवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. स्थानिकांनी अनेक वेळा रस्ता बांधकामासाठी प्रयत्न केले, परंतु अपुऱ्या निधीमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.

ahilyanagar
Crime News: गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला, शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या; ९ तास दार बंदच, शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी..

या भागातील लोकांना अजूनही जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे पावसाळ्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो . या घटनेनंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com