Shocking Crime: काम देण्याच्या बहाण्याने गुजरातला नेलं, अडीच लाखांत तरूणीची विक्री अन् लग्न लावून दिलं; शेवटी युवतीने..

Forced Marriage Case: अमरावती शहरातील एका युवतीला काम देण्याचे आमिष दाखवत गुजरातला नेण्यात आले आणि जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

काम देण्याच्या बहाण्याने एका युवतीला गुजरातमध्ये नेऊन जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणी अमरावती शहरातील असून, पीडित युवतीने गुजरातमधून सुटका करून घेतल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी २ महिलांसह एका पुरूषाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कामाच्या आमिषाने फसवणूक

१९ जानेवारी २०२५ रोजी, वलगाव हद्दीत राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने पीडित युवतीला काम मिळवून देण्याचे सांगत जवळीक साधली. स्वयंपाकाच्या कामासाठी मुर्तिजापूरला घेऊन जातो असे सांगून युवतीला बडनेरा रेल्वे स्थानक येथे नेण्यात आले. मात्र, तिथून मुर्तिजापूर न नेता तिला गुजरातमध्ये नेण्यात आलं.

तिथे २ लाख ६० हजार रुपयांचा व्यवहार करत जबरदस्तीने एका पुरुषाशी तिचा विवाह लावण्यात आला. युवतीच्या इच्छेविरुद्ध घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र, यानंतर पीडित युवतीने तेथून पळ काढला आणि अमरावतीत परतली. अमरावतीत परत आल्यानंतर तिने वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Crime News
BJP Leader: '१०० एकर जमीन वडिलोपार्जित, ती माझी नाही'; गिरीश महाजनांच्या आरोपांवर खडसेंचं स्पष्टीकरण

वलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन महिलांसह राजेश बेला (वय ३७, रा. कनकोट, गुजरात) यांच्याविरुद्ध अपहरण, फसवणूक आणि जबरदस्तीने विवाह लावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही महिला अमरावती शहरातील रहिवासी आहेत. तसेच राजेश बेला हा गुजरातमधील कनकोट गावचा रहिवासी आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Crime News
Crime: सुनेच्या बाजूला चिमुकली झोपलेली, आजी- आजोबा अन् आत्यानं गळा चिरून केलं ठार; रात्रभर..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com