Crime: सुनेच्या बाजूला चिमुकली झोपलेली, आजी- आजोबा अन् आत्यानं गळा चिरून केलं ठार; रात्रभर..

Shocking Crime in Saharanpur: सहारनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. फक्त पाच महिन्यांची निष्पाप चिमुरडी इशिका हिची रात्रीच्या अंधारात निर्घृण हत्या करण्यात आली.
Crime News
Crime Newsx
Published On

उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फक्त पाच महिन्यांची निष्पाप चिमुकलीची रात्रीच्या अंधारात निर्घृण हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अमानवी कृत्यामागे कुणी परके नाही, तर तिची आजी, आजोबा आणि अत्या असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

इशिका असे ५ महिन्यांच्या चिमुकलीचे नाव आहे. ही ह्रदयद्रावक घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलेहेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुतुबपूर कुसैनी गावात घडली. इशिका ही आपल्या आईजवळ झोपली असताना, रात्री तिचा गळा चिरण्यात आला. ही हत्या इतक्या चलाखीने करण्यात आली की तिच्या आईला रात्रभर काहीच संशय आला नाही. मात्र सकाळी इशिका रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर संपूर्ण घरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली आणि फॉरेन्सिक टीमसह तपास सुरू करण्यात आला.

Crime News
Shocking: 'माझ्याकडे बघून तो हस्तमैथुन..' टेरेसवर तरूणाचे अश्लील चाळे, फोटो व्हायरल करत तरूणी म्हणाली..

तपासादरम्यान समोर आलेली माहिती धक्कादायक ठरली. पोलिसांनी सांगितले की, आजी आणि आजोबांचा त्यांच्या सुनेशी दीर्घकाळापासून वाद सुरू होता. सासू-सासरे सुनेवर संशय घेत होते, त्यामुळे कौटुंबिक तणाव शिगेला पोहोचला होता. या तणावातूनच त्यांनी आपल्या नातवाची हत्या करण्याचा अमानुष कट रचला. पोलिसांच्या माहितीनुसार, सासूने आपल्या पतीकडून ब्लेड घेत निष्पाप इशिकाचा गळा चिरला, तर अत्या हे सर्व शांतपणे पाहत होती.

हत्या केल्यानंतर, चिमुरडीला पुन्हा तिच्या आईजवळ झोपवण्यात आले जेणेकरून तिचा मृत्यू नैसर्गिक वाटावा. मात्र, पोस्टमॉर्टेम अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीत खरे सत्य समोर आले. या हत्येमागे केवळ सुनेला मानसिक त्रास देण्याचा उद्देश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. इशिकाचे वडील राजन हे घटनेच्या वेळी केरळमध्ये काम करत होते. घरात त्या वेळी त्यांची पत्नी आणि सासरच्या मंडळींचीच उपस्थिती होती.

Crime News
Haribhau Bagade: जोधा अकबरची कहाणी खोटी, अकबरचं लग्न जोधाशी नव्हे तर.., राज्यपाल बागडेंचा मोठा दावा

याप्रकरणी पोलिसांनी आजी, आजोबा आणि अत्या यांच्याविरोधात खुनाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले आहे. उर्वरित कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com